खबरदारी घ्या, विद्युत अपघात टाळा!
कोणत्याही मूलभूत गरजेइतकीच वीजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. जीवन सुखकर बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्याला विजेचा फायदा होऊ शकतो, त्याचप्रमाणे ती वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर विद्युत अपघात घडून नुकसान होऊ शकते. सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळले तर हे अपघात टाळता येतात. महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त...
शॉर्टसर्किटपासून होणारे अपघात असोत की, वीज हाताळताना होणारे अपघात, हे खबरदारी न घेतल्यामुळेच होतात. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत विद्युत अपघाताच्या घटना पाहता आता अधिक जागरूकतेने व सुरक्षितपणे विजेचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे. याकरिता प्रभावी जनजागृतीची आवश्यकता आहे.
चुकीला माफी नाही: 'वीज' ही अशी बाब आहे, ही डोळ्याने दिसत नाही परंतु ती वापरताना काळजी घेतली नाही तर होणारे परिणाम टाळता येत नाहीत. वीज हाताळताना चुकीला माफी नाही. त्यामुळे वीज उपकरणे हाताळताना काय काळजी घ्यावी, याचा प्रत्येकानेच गांभीर्याने विचार करावा.
दर्जेदार उपकरणांचा वापर:घर, उद्योग,कार्यालय अथवा शेती असो, वीज वापरताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. वीजपुरवठा घेताना किंवा वेळोवेळी विद्युत केबल, स्विचेस अथवा इतर उपकरणे ही 'आयएसआय' प्रमाणित असल्याचे व योग्य क्षमतेचे असल्याची खात्री करावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नये. प्रमाणित ठेकेदारांकडूनच विद्युतीकरणाची कामे करुन घ्यावीत. वायरिंगसाठी योग्य क्षमतेचे एमसीबी (मिनिएचर सर्किट ब्रेकर) वापरावेत, जेणेकरून अतिभार किंवा शॉर्टसर्किटमुळे धोका निर्माण होणार नाही. गुणवत्ता नियंत्रण मंडळाने प्रमाणित केलेली विद्युत उपकरणेच वापरावीत. उदा. मिक्सर, पाण्याचे हीटर, टोस्टर, ग्राईंडर, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी.
योग्य अर्थिंग: वीज वापरामध्ये अर्थिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक अपघात हे योग्य प्रकाराची अर्थिंग न केल्यामुळे घडल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी कॉपर प्लेट किंवा कॉपर रॉडची अर्थिंग कार्यक्षमपणे घेणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.
इन्सुलेटेड वायरचा उपयोग: अर्थ लीकेजपासून होणारा धोका टाळण्यासाठी ईएलसीबी (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) वापरावे. मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये २० ते ५० मीटरची स्वतंत्र मीटर रूम असते. बऱ्याच वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मीटर रूम स्वच्छ, प्रकाशित व हवेशीर असली पाहिजे. पावसाळ्यात मीटर रूममध्ये पाणी जाणार नाही; त्याचबरोबर भिंती ओल्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मीटर रूमचा वापर स्टोअर रूम म्हणून करू नये. मीटर रूममध्ये उंदरांचा वावर होणार नाही, याकडेही लक्ष दिले पाहिजे. तेथे ज्वालाग्राही पदार्थ ठेवणे टाळावे. न्युट्रल वायरसाठी उघड्या वायरचा वापर न करता इन्सुलेटेड वायरचाच वापर करा. एका सर्किटमध्ये मल्टी प्लग/तारा घालू नका. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगीस निमंत्रण मिळते.
मेन स्विचचा वापर: शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यास प्रथम मेन स्विच बंद करा. विद्युतरोधक अग्निशमनचा वापर करा. पाण्याचा वापर करू नका. प्लग, पिन, बटण, बोर्ड यांना तडे गेल्यास ती त्वरित बदलावीत. पंखे, इस्त्री, कूलर वापरताना त्यात वीजप्रवाह उतरू शकतो. याची जाणीव ठेवूनच सावधानतेने ती हाताळावीत.
आयुष्याचे मोल जाणा:विजेविषयी अज्ञान असणे, ही गोष्ट जितकी भयानक आहे, त्याहीपेक्षा ज्ञान असूनही निष्काळजीपणा, फाजील आत्मविश्वास हे अधिक भयंकर आहे. अतिउत्साहात अगदी निष्णात लोकदेखील हातात रबरी ग्लोव्हज घालणे, पायात सेफ्टी बूट वापरणे तसेच वीजपुरवठा बंद करून मग काम करणे, अशा छोट्याछोट्या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. रात्रंदिवस विजेच्या क्षेत्रात काम करणारे कामगार, जनमित्र, वायरमन यांनी आपले जीवनमूल्य जाणून घेऊन आपल्यावर आपल्या कुटुंबाचीही जबाबदारी असल्याचे भान ठेवूनच विद्युतीकरणाचे काम करावे. सुरक्षेचे उपाय हे केवळ आपल्यासाठी नसून आपल्याशी निगडित प्रत्येक घटकासाठी तितकेच महत्वाचे आहेत, याची जाणीव सातत्याने ठेवणे महत्वाचे आहे
दैनंदिन वीज वापरातील महत्वाच्या बाबी: विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका. वीजवाहिनीच्या खाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका. विद्युत खांब किंवा खांबांचा ताण यांना गुरे-ढोरे बांधू नका. विद्युतप्रवाह सोडू नका. तात्पुरते लोंबकळणारे वायर वापरू नका. विजेचा अनधिकृत वापर टाळा. कुलरमध्ये पाणी टाकताना वीजपुरवठा बंद ठेवा. विजेच्या तारेखाली कापलेले पीक ठेवू नका. कपडे वाळवण्यासाठी वीज तारांचा वापर करू नका. विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या असतील तर त्यांना स्पर्श करू नका किंवा त्या ओलांडून जाण्याचा प्रयत्न करु नका व इतरांनाही तसे करू देऊ नका.
- विजयसिंह दुघभाते, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कल्याण परिमंडल.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
Tejal KhanvilkarWith an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.