फ्लॅटमध्ये सांडपाण्याची गळती दुरूस्तीसाठी कॅन्सरपिडीताची, तळोज्यात लोढा बिल्डरकडून फरफट ! लोढाविरोधात उपोषणास बसण्याचा इशारा

ठाणे/मुंबई : तळोजा येथील लोढा बिल्डरच्या  क्राऊन प्रकल्पात  कॅन्सरपिडीत डॉ. विरेंद्र वर्मा  यांनी ऑर्चिड सोसायटीत घेतलेल्या फ्लॅटमध्ये गेले तीन वर्षापासून सांडपाण्याची गळती सुरू आहे वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटधारकाच्या सांडपाण्याची लाईन  वर्मा यांच्या स्वयंपाकघरातून नेण्यात आली असून, ती लपवण्यासाठी बिल्डरने  फॉल्स सिलिंग  चा वापर करून फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने, कॅन्सरपिडीत डॉ. विरेंद्र वर्मा यांनी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या लोढा बिल्डरच्या विरोधात उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.


डॉ. विरेंद्र वर्मा, चेतना वर्मा यांनी लोढा बिल्डर्सच्या तळोजा येथील क्राऊन प्रकल्पातील ऑर्चिड , क्राऊन, जस्मिन, पर्ल, व्हॉयलेट, पाच इमारतींच्या समुहातील ऑर्चिड सोसायटीच्यामधे २०२० मधे तळमजल्यावर ००८ क्रमांकाचा ३८०चौ. फूटांचा फ्लॅट तीस लाख रूपयांना विकत घेतला. (डॉ. वर्मा यांना परळ-लालबाग परिसरात स्थानिक रहिवाशांना छळणाऱ्या जागा मालक आणि दहशत माजवणाऱ्या बिल्डरांच्याविरोधात दंड थोपटून उभा राहाणारा न्यायालयीन लढा देणारा तज्ञ निर्भीड समाजसेवक, प्राणीमित्र म्हणून ओळखतात) फ्लॅट घेतला आणि त्याच दरम्यान डॉ. वीरेंद्र वर्मा यांना कॅन्सर झाला, टाटा रुग्णालयात वर्षभर उपचारांसाठी दाखल असल्यामुळे फ्लॅटमध्ये वास्तव्यासाठी वर्मा आजतागायत गेलेच नाहीत मात्र २०२३मधे फ्लॅटमधून पाणी व्हरांड्यात येत असल्याची तक्रार ऑर्चिड सोसायटीच्या कार्यालयाकडून करण्यात आली आणि त्वरित हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यावर आपल्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आपण टाटा रुग्णालयाच्या आय.सी.सी. कक्षात दाखल असल्याचं कळवलं.

मात्र सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं काहीएक ऐकून न घेता सोसायटीत येण्यासाठी दबावच आणला. यावर टाटा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून काही तासांची परवानगी घेऊन डॉ. वर्मा त्यांच्या मित्रांच्या मदतीने कसेबसे तळोज्यात पोहोचले, सोसायटीच्या कर्मचाऱ्यांसमोर फ्लॅट उघडला असता संपूर्ण फ्लॅट सांडपाण्याने भरला होता, स्वयंपाकघर, शौचालयाच्या वरच्या भागात बसवलेल्या न्हाणीट्रॅपमधून सांडपाणी स्वयंपाकाच्या ओट्यावर शौचालयातील कमोडवर गळती होऊन काळेठिक्कर पडले होते यात कहर म्हणजे वरच्या फ्लॅटमधून डॉ. वर्माच्या छताला लागून जाणारी सांडपाण्याची लाईन उघडकिस आली होती कारण सांडपाण्याच्या गळतीने बिल्डरकडून ती लपवण्यासाठी करण्यात आलेलं फॉल्ससिलिंगच कोसळून जमिनीवर पडलं होतं सांडपाण्याच्या लाईनबाबत माहिती देण्यात , सॅम्पल फ्लॅट दाखवताना घरातून जाणाऱ्या आली नव्हती.


नामांकित लोढा बिल्डर कडून अशाप्रकारे झालेल्या फसवणुकीने डॉ. विरेंद्र वर्मा यांना मोठा मानसिक धक्का बसला. या सगळ्या परिस्थितीला बिल्डरच्या वास्तुविशारदाच्या आराखड्यात श्रृटी असल्याचा आरोप, त्यांनी सोसायटीच्या कर्मचाऱ्यांकडे केला. यावर त्याला आम्ही काही करू शकत नाही तुम्ही शेजारच्या इमारतीत लोढा बिल्डरचं कार्यालय आहे, तिथे दुरुस्तीची काम बघणाऱ्या, विकास झोटींगला भेटून तक्रार करण्यास सांगण्यात आलं.

यात कहर म्हणजे, त्या परिस्थितीत फ्लॅटमध्ये झालेली गळती रोखण्यासाठी सोसायटीने बाहेरून जोडारी आणून त्यावर तात्पुरती मलमपट्टी करून त्याचा दुरुस्ती खर्चही डॉ. वर्मा याच्याकडून घेण्यात आला. "फ्लॅटच्या आतल्या भागातून नेण्यात आलेल्या सांडपाण्याची लाईन बाहेरून नेण्यात आली असती तर, आज अशी समस्या आलीच नसती" असं डॉ. वर्मा सांगतात.

असाच गळतीचा प्रकार पुढे तीनवेळा फ्लॅटमध्ये होवून त्याचा खर्चही वर्षांच्या माथी मारण्यात आला, कॅन्सरच्या उपचार आणि डझनभर छोट्यामोठ्या शस्त्रक्रियांनी त्रस्त झालेल्या वर्मा यांनी शेजारीच असलेल्या लोढा बिल्डरच्या कार्यालयातील व्यवस्थापकांना भेटण्यासाठी गेले असता तेथील कर्मचारी विकास झोटींग यांनी  व्यवस्थापक मिटिंगला गेले असल्याचं सांगून, ऑर्चिड  ई  विंगमधील फ्लॅट ००८ ची सोसायटीकडून तक्रार आली असून, सांडपाण्याची गळती थांबवण्यासाठी उपाययोजना केली असून फॉल्ससिलिंग नव्याने बनवून देण्यात येणार असल्याचे सिव्हिलवर्क बघणारे विकास झोटींग यांनी डॉ वर्मा यांना सांगत, तुमचा फ्लॅटही सध्या काही दिवस निरिक्षणाखाली असल्याचं विकास यांनी सांगितले दरम्यान बिल्डरने किचन आणि शौचालयाच्यावरचे फॉल्ससिलिंग नव्याने बदलून दिलं मात्र, त्याच्याआत बसवण्यात आलेली सांडपाण्याची लाईन फ्लॅटच्या बाहेरून दिली नसल्यामुळे पुन्हा गळती झाल्यास काय करणार असा प्रश्न डॉ.वर्मा यांना पडला आहे, कॅन्सरपीडीत डॉ. विरेंद्र वर्मा सोसायटी आणि लोढा बिल्डर्सकडून होत असलेल्या फरफटीला कंटाळले असून सज्य ग्राहक तक्रार मंचाकडे धाव घेतली असून आपल्यावर लोढा बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीविरोधात दाद मागण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे!

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट