चित्रपट साबर बोंड
मुंबई – रोहन परशुराम कानवडे लिखित व दिग्दर्शित, तसेच सनडान्सने प्रशंसित केलेला साबर बोंड (कॅक्टस पिअर्स) हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. राणा दग्गुबती यांच्या स्पिरिट मीडियाने या चित्रपटाचे वितरण केले आहे. स्पिरिट मीडियाने यापूर्वी प्रसिद्ध कान्स ग्रँड प्रिक्स विजेता ऑल वी इमॅजिन अॅज लाईट इन इंडियाचे वितरण केले होते. साबर बोंड हा लक्षवेधक व अनोखा चित्रपट आहे, जो सहजता, स्पष्टता आणि सर्जनशील दृढनिश्चयासह निर्मिती करण्यात आला आहे.
हा चित्रपट शहरी निवासी आनंदच्या अवतीभोवती फिरतो, जो वैयक्तिक नुकसान आणि कौटुंबिक दबावांशी झुंजत असताना त्याच्या वडिलोपार्जित गावात १० दिवसांच्या शोकविधीला सुरुवात करतो. पश्चिम भारतातील खडतर स्थितीमध्ये, त्याला त्याचा बालपणीचा मित्र बाल्याकडून सांत्वन व आधार मिळते, जो त्याच्यासारख्याच सामाजिक अपेक्षांचा सामना करत असतो. भूषण मनोज, सुरज सुमन आणि जयश्री जगताप यांच्यासारखे उत्कृष्ट कलाकार असलेल्या या चित्रपटाचे कथानक आव्हानात्मक परिस्थितीत निर्माण झालेल्या वैयक्तिक नातेसंबंधांच्या गुंतागूंतींना नाजूकपणे सादर करते आणि व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचा आदर करण्यासाठी लागणाऱ्या धाडसाला साजरे करते.
अनेक चित्रपटांपैकी एक असलेला साबर बोंड (कॅक्टस पिअर्स) या चित्रपटाने या वर्षाच्या सुरूवातीला इतिहास रचला, जेथे सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये विजेता म्हणून पहिला भारतीय काल्पनिक चित्रपट ठरला. तसेच या चित्रपटाला प्रतिष्ठित ग्रँड ज्युरी प्राइझसह सन्मानित करण्यात आले. जगभरातील हजारो सबमिशनमधून निवडण्यात आलेला हा स्पर्धेमधील भारतातील एकमेव चित्रपट होता आणि फेस्टिवलमध्ये प्रीमियर करण्यात आलेला पहिला मराठी भाषिक चित्रपट म्हणून आणखी एक टप्पा गाठला. ज्युरीच्या प्रशस्तिपत्रात म्हटले आहे की, “ही एक महान आधुनिक प्रेमकथा आहे. या चित्रपटाला पुरस्कार मिळणे हा सन्मान आहे असे म्हणणे देखील कमी लेखण्यासारखे आहे. चित्रपट पाहताना आमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले, आम्ही हसलो आणि आमच्यामध्ये त्याच प्रकारे प्रेम मिळावे अशी इच्छा निर्माण झाली. जगाला सध्या याचीच गरज आहे. कथानकामधील प्रामाणिक दृष्टिकोन आपल्या सर्वांमध्ये जिव्हाळ्याची भावना जागृत करतो. आपल्याला या चित्रपटामधील प्रमुख पात्रांच्या अंतर्गत जीवनाच्या हृदयस्पर्शी भावना जाणवतातआणि या भावना व्यक्त होतात तेव्हा आपण कथानकामध्ये भारावून जातो. आम्ही साबर बोंड (कॅक्टस पिअर्स) या चित्रपटाला वर्ल्ड सिनेमा ब्रँड ज्युरी प्राइझ: ड्रॅमॅटिकसह पुरस्कारित केले आहे.''
तेव्हापासून, या चित्रपटाने जगभरात प्रवास केला आहे, २५ हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच बेस्ट फिचर फिल्म, ऑडियन्स चॉईस अवॉर्ड्स आणि एसएक्सएसडब्ल्यू लंडन, सॅन फ्रान्सिस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, आयएफएफएलए अशा प्रतिष्ठित व्यासपीठांवर सन्माननीय उल्लेखांसह प्रशंसा मिळवली आहे. जगभरात प्रशंसा होण्यासह या चित्रपटाने सर्वात प्रसिद्ध भारतीय चित्रपट म्हणून ख्याती मिळवली आहे. आता, चित्रपट ‘साबर बोंड' अखेर भारतात प्रदर्शित होण्यासह मायदेशी परतला आहे.
साबर बोंडच्या भारतात रीलीजसाठी सहयोग करण्याबात स्पिरिट मीडियाचे राणा दग्गुबाती म्हणाले, “स्पिरिट मीडियामध्ये आम्ही भाषा आणि सीमांच्या पलीकडे जाऊ शकणाऱ्या उत्तम कथांना पाठिंबा देतो. साबर बोंडने भारतीय चित्रपटाला जागतिक स्तरावर नवीन उंचीवर नेले आहे. या चित्रपटात असा प्रामाणिकपणा आणि कोमलता आणण्याचे सर्व श्रेय रोहन यांना आणि या चित्रपटाच्या प्रवासाला पाठिंबा दिल्याबद्दल निर्मात्यांना जाते. आता हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे, जेथे प्रेक्षकांना या चित्रपटाची लक्षवेधकता व सत्यामध्ये स्वत:च्या जीवनाचा अनुभव मिळेल.''
या चित्रपटाचा प्रवास आणि भारतातील रीलीजबाबत मत व्यक्त करत लेखक व दिग्दर्शक रोहन परशुराम कानवडे म्हणाले, “स्पिरिट मीडिया भारतात साबर बोंडचे वितरण करणार असल्यामुळे अविश्वसनीय क्षण वाटत आहे. या चित्रपटामध्ये माझ्या जीवनातील अनुभवांना प्रेम, स्वीकृती व स्थिरतेबाबत कथानकामध्ये सादर करण्यात आले आहे. जगभरातील प्रेक्षकांनी या चित्रपटाचे केलेले कौतुक पाहून खूप आनंद होत आहे, पण भारतात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे वेगळे समाधान आहे. या सहयोगाबाबत मला उत्साहित करणारी बाब म्हणजे चित्रपट प्रदर्शित करण्यासोबत त्यामधून मिळणारी शक्यता, जसे प्रादेशिक, वास्तविक व भावनिकदृष्ट्या प्रामाणिक भारतीय कथांना येथे थिएटरमध्ये वाव मिळण्याची आणि आपल्या मोठ्या सांस्कृतिक वारसामध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. स्पिरिट मीडियासह मला विश्वास आहे की, साबर बोंड संपूर्ण भारतातील प्रेक्षकांचे मन जिंकून घेईल.''
या चित्रपटाचा सहयोगत्मक प्रवास आणि भारतातील रीलीजबाबत एकत्रितपणे मत व्यक्त करत निर्माते म्हणाले, “साबर बोंड व्यापक उत्कटतेचा अनुभव आहे, जो सीमा व समुदायांपलीकडे सहयोगाच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. जगभरात या चित्रपटाला मिळालेली प्रशंसा असाधारण आहे, पण या थिएटर रीलीजच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांना या चित्रपटाचे मनोरंजन देणे आम्ही हा चित्रपट बनवण्याचे खरे साजरीकरण आहे. आम्हाला विशेषत: स्पिरिट मीडियासोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे, ज्यांनी या चित्रपटावर दाखवलेल्या विश्वासामुळे हा चित्रपट मायदेशात परतणे अधिक अर्थपूर्ण केले आहे. या क्षणाव्यतिरिक्त आमचा विश्वास आहे की, आमच्यासारख्या चित्रपटांसाठी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये स्थान मिळवण्यासाठी ही मोठ्या प्रवासाची सुरूवात आहे.''
व्हेनिस बिएनाले कॉलेज सिनेमा २०२२-२०२३ व एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्प अंतर्गत विकसित केलेला आणि फिल्म लंडन प्रोडक्शन फायनान्स मार्केट, एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्प, फिल्म बाजार को-प्रोडक्शन मार्केट, व्हेनिस गॅप फायनान्सिंग मार्केट आणि गोज टू कान्स सारख्या जागतिक व्यासपीठांवर सादर केलेला साबर बोंड (कॅक्टस पिअर्स) आंतरराष्ट्रीय सहयोगी प्रयत्नामधील उत्कृष्ट प्रतिभांना दाखवतो. निर्माते नीरज चुरी (यूके), मोहम्मद खाकी (कॅनडा), कौशिक रे (यूके), नरेन चंदावरकर (भारत), सिद्धार्थ मीर (भारत) आणि हरीश रेड्डीपल्ली (भारत), तसेच सह-निर्माता नेहा कौल व प्रशंसित अभिनेता जिम सर्भ आणि सहयोगी निर्माता राजेश परवटकर यांच्यासह या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
भारतात प्रदर्शित होण्यासोबत साबर बोंडने स्ट्रँड रिलीजिंगसह उत्तर अमेरिकन वितरण मिळवले आहे. स्ट्रँड रिलीजिंग जगभरातील धाडसी, दूरदर्शी चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध आर्टहाऊस बॅनर आहे.
मुख्य श्रेय
दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
रोहन परशुराम कानवडे
कलाकार
भूषण मनोज
जयश्री जगताप
सुरज सुमन
सिनेमॅटोग्राफर (छायालेखक)
विकास उर्स
संपादक
अनादी आठले
कलरिस्ट
हिमांशू कांबळे
साऊंड डिझाइनर
अनिर्बन बोरठाकूर आणि नरेन चंदावरकर
कॉस्च्युम डिझाइनर
सचिन लोवळेकर
रोहन कानवडे यांच्याबद्दल
रोहन एका सामान्य कुटुंबातून आले आहेत, त्यांचे संगोपन मुंबईतील झोपडपट्टीमधील एका खोलीच्या घरात ड्राइव्हर वडिलांनी आणि अशिक्षित गृहिणी आईने केले आहे. त्यांनी इंटीरियर डिझाइन केले असून स्वयंनिर्मित चित्रपट निर्माता आहेत. त्यांचे लघुपट जागतिक स्तरावर प्रदर्शित झाले आहेत. त्यांचा पहिला चित्रपट साबर बोंड (कॅक्टस पिअर्स) व्हेनिस बिएनाले कॉलेज सिनेमा २०२२-२०२३ मध्ये आर्म्स ऑफ अ मॅन या शीर्षकाखाली विकसित करण्यात आला होता. हा चित्रपट फिल्म लंडन प्रोडक्शन फायनान्स मार्केट २०२१, एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्प २०२१, फिल्म बाजार २०२२, व्हेनिस गॅप फायनान्सिंग मार्केट २०२३ आणि गोज टू कान्स २०२४ चा देखील भाग होता.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble