विसर्जनावेळी निर्माल्याचे होणार खत..श्री बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे नगरपंचायतला निर्माल्य कलश

पाली : पाली, श्री बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे बुधवारी (दि. २७) पाली नगरपंचायत कडे तीन मोठे निर्मात्य कलश देण्यात आले. गणेश विसर्जनावेळी या निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य जमा केले जाणार आहे. आणि या निर्मात्याचे खत बनवले जाणार आहे.

 

श्री बल्लाळेश्वर देवस्थान अनेक प्रकारचे विधायक सामाजिक उपक्रम राबवित असतात. आत्ता गणेशोत्सव चालू आहे आणि गणपती विसर्जनाच्या वेळी देवाचे पवित्र निर्माल्य इकडे तिकडे पडू नये तसेच पर्यावरणाची हानी होऊ नये.

यासाठी पाली अंबा नदीवर विसर्जनासाठी जाणाऱ्या गणपतीं बरोबर असणारे निर्माल्य एकत्रित संकलन करून त्याचा योग्य विनियोग करावा या हेतूने पाली नगरपंचायत प्रभारी नगराध्यक्ष अरिफ मनियार व मुख्याधिकारी माधुरी मडके यांनी श्री बल्लाळेश्वर देवस्थानकडे गणपती विसर्जनाच्या ठिकाणी ठेवण्यासाठी तीन मोठ्या निर्माल्य कलशाची मागणी केली.

त्यानुसार श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली यांनी तीन मोठे आकर्षक निर्माल्य कलश नगरपंचायतीस उपलब्ध करून दिले. अशी माहिती श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी दिली. निर्माल्य कलश देतेवेळी श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, उपाध्यक्ष वैभव आपटे, श्री. मराठे सर, पाली नगरपंचायत प्रभारी नगराध्यक्ष औरफ मनियार, मुख्याधिकारी माधुरी मडके व नगरपंचायत कर व प्रशासकीय अधिकारी सोनल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी आपल्यासोबत असलेले निर्माल्य कुठेही न टाकता ते निर्माल्य कलशातच टाकावे असे आवाहन पाली नगरपंचायत मार्फत करण्यात आले आहे.

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट