ग्लोबल गणराया पुरस्कार २०२५ सोहळा .
ग्लोबल गणराया पुरस्कार २०२५ सोहळा
सर्वोत्कृष्ट ग्लोबल गणराया २०२५ पुरस्काराने गिरगाव चा राजा, निकदवरी लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवाजीपार्क चा विघ्नहर्ता सन्मानित
थॅलसेमिया मुक्तीसाठी लग्नाआधी थॅलसेमिया तपासणी चा कायदा निघावा- आ. प्रा मनिषा कायंदे*
ग्लोबल गणराया स्पर्धा आगळी व अभिनंदनीय- आ. प्रा मनिषा कायंदे
ग्लोबल गणराया स्पर्धा ही दैनिकाच्या नावाप्रमाणेच ग्लोबल आहे...ज्येष्ठ रंगकर्मी प्रदिप कबरे
ऐतिहासिक वारसा सांंगताना वर्तमानातील सर्वसामान्यांच्या जगण्याच्या विषयावर जनजागृती होणे आवश्यक आहे, म्हणूनच आपल्या एक दशकाहून जास्त वाचकप्रिय, 'अ' दर्जा च्या दै. 'द ग्लोबल टाइम्स ' ने वर्तमानाशी संबंधित, विषय घेऊन 'ग्लोबल गणराया,जागृत मंडळ ' या वैशिष्टय़पुर्ण घोषवाक्याने स्पर्धा आयोजित केली.
पर्यावरण रक्षण, निसर्ग संवर्धन ,घातक थॅलेसेमिया आजार जनजागृती , छत्रपती शिवराय व संभाजी राजे यांचे गडकोट ,माय मराठी अभिजात मराठी ,महिला सुरक्षा ,जय जवान जय किसान या विषयांवर मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापुर जिल्ह्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत काही घरातील गणपतींच्या देखाव्यांनी लक्ष वेधले. आणि तेही पुरस्काराचे कौतुकाचे मानकरी ठरले. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र,आकर्षक पुरस्काराने सर्वोत्कृष्ट ग्लोबल गणराया व उत्कृष्ट ग्लोबल गणराया व उत्तेजनार्थ पुरस्काराने विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. भव्य व दिमाखदार अशा शारदा मंगल कार्यालय, दादर पुर्व येथे दि १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची सुरुवात मान्यवर पाहुण्यांच्या ,ग्लोबल स्त्रीशक्ती पुरस्कार विजेत्यांच्या तसेच सहसंपादक सुहास कांबळे यांच्या शुभहस्ते श्री गणरायांना वंदन करुन , देवी सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या सोहळ्याची सुरवात 'ग्लोबल स्त्रीशक्ती सन्माना' ने महिला सशक्तिकरणासाठी काम करणाऱ्या पुर्णिमा शिरीषकर (संस्थापक , झेप उद्योगिनींची व शेअर बाजार विश्लेषक) , नेत्रा दीक्षित ( क्रिस्पीबाईटस, उद्योजिक ) पुष्पा डावरे (मध्य रेल्वे व एन आय एस, प्रशिक्षक) या दामिनींना सन्मानित करण्यात आले.
प्रा.मनिषा कायंदे, सुजाता रायकर, द ग्लोबल टाईम्स च्या संचालक तेजल तुषार खानविलकर व कृत्तिका तुषार खानविलकर, कार्यकारी संपादक शीतल हरीष करदेकर यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह आकर्षक भेटवस्तू देऊन हा गौरव करण्यात आला.
थॅलसेमिया मुक्तीसाठी लग्नाआधी थॅलसेमिया तपासणी चा कायदा निघावा तसेच ग्लोबल गणराया स्पर्धा आगळी व अभिनंदनीय- आ. प्रा मनिषा कायंदे असे स्पष्ट मत आ.प्रा.मनिषा कायंदे यांनी व्यक्त केले. विधानपरिषदेच्या आमदार प्रा मनिषा कायंदे कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. त्या म्हणाल्या की ,"ग्लोबल गणराया स्पर्धेत विषय महत्वपूर्ण घेतले आहेत.मी विधानपरिषद आमदार म्हणून थॅलसेमियावर नियंत्रण येण्यासाठी लग्ना आधी याची चाचणी आवश्यक करण्यासाठी कायदा करता यावा म्हणून प्रयत्न करीन.
हा विषय द ग्लोबल टाईम्स ने घेतला म्हणून कौतुक अभिनंदन! तसेच पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन!"
विशेष अतिथी म्हणून थॅलसेमिया मुक्तीदूत सुजाता रायकर व ज्येष्ठ रंगकर्मी प्रदिप कबरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजल व कृत्तिका तुषार खानविलकर यांनी दैनिक ग्लोबल टाईम्स ची तेरा वर्षांची वाटचाल आणि याकामी आपले वडील ग्लोबल टाइम्स चे सर्वेसर्वा तुषार खानविलकर यांच्या भूमिकेबद्दल ओघवत्या शैलीत मनोगत व्यक्त केले. आणि सहकार्य करणार्या सर्वाचे आभार मानले. ग्लोबल गणराया स्पर्धेबद्दल कार्यकारी संपादक शीतल करदेकर यांनी स्पर्धेचे वेगळेपण सांगताना, अभिजात मराठी भाषा, स्त्रीसक्षमीकरण, घातक आजार थॅलसेमिया असे विषय घेऊन आमचा द ग्लोबल टाइम्स शासनाच्या जनजागृतीपर कार्यात मोठा हातभार लावत आहे. असे स्पष्ट केले" तर 'थॅलसेमिया मुक्त महाराष्ट्र" करण्यासाठी मोठे काम करणार्यां, सुजाता रायकर यांना थॅलसेमियावर नियंत्रण येण्यासाठी सरकारसह लोकसहभाग आवश्यक असल्याचे आवाहन उपस्थितांना केले. पुरस्कार विजेत्या क्रिस्पी बाईटस च्या नेत्रा दीक्षित यांनी आपल्या दोन वर्षातील चढत्या यशाची माहिती दिली. तर पुष्पा डावरे यांनी, खेळाडूपणाचा उपयोग फिटनेस सह धाडस करण्यास कसा होतो हे सांगून प्रत्येक महिला सजग असेल तर सुरक्षित सक्षम राहील असे आवाहन केले.
ग्लोबल गणराया हा मुख्य पुरस्कार प्रदान सोहळा तब्बल एक तास सर्व पुरस्कार विजेत्यांच्या कौतुक अभिनंदनाने रंगला. यात बाजी मारलेल्या विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,शाल, पुष्पगुच्छ, सरस्वतीची चांदीची तस्वीर व क्रिस्पीबाईटस चे फराळ भेट म्हणून देण्यात आले र्वोत्कृष्ट ग्लोबल गणराया पुरस्काराचे मानकरी म्हणून बांबू प्रारंभ ते अंत हा विषय सादर करणारे गिरगाव चा राजा, निकदवरी लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि लेफ्ट ब्रेन एक्टिविटी हा वेगळा पण अत्यंत महत्त्वपुर्ण विषय साकारणारा , शिवाजीपार्क चा विघ्नहर्ता मंडळाना गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट ग्लोबल गणराया पुरस्काराने 'विशेष मुलांचा बाप्पा' हा वेगळा विषय मांडणारे 'स्वप्नक्षय मित्र मंडळ ' ,मॉडेल टाऊन सार्वजनिक गणेशोत्सव, अंधेरी शेतकरी ,वारकरी विषयावर चलचित्र साकारणारे गोड गणपती, अखिल चंदन वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खाकी कर्तव्याची कहाणी मांडधारे नवयुग उत्सव मित्र मंडळ (एल. आय. जीचा राजा) सेक्टर -१०, नेरूळ नवी मुंबई या सार्वजनिक गणेशोत्सवांसह या गणेशोत्सव मंडळासह विठ्ठल रुपात गणपती व वारकरी परंपरा आपल्या घरच्या गणपतीसाठी प्रदर्शनातून सादर करणारे ,केशव उंडे वाली ,रोहा ,रायगड आणि अभिजात मराठी माय मराठी प्रदर्शन आपल्या घरच्या गणपतीसाठी साकारणारे ,सागर गुजर रत्नागिरी ,गुहागर, देवघर यांना उत्कृष्ट ग्लोबल गणराया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर * ग्लोबल गणराया उत्तेजनार्थ पुरस्कारात विघ्नहर्ता अरुणोदयाचा ,घणसोली सम्राट ,कोपर खैरणेचा गजरुप ,वाशीचा आगमनाधिश, सानपाड्याचा महाराजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह घरच्या गणपतीसाठी , रायगड किल्ले गडाचा दरवाजा साकारत. मावळ्यांचं चलचित्र सादर करणारे सतीश म्हात्रे , सांताक्रूझ (प) मुंबई कष्टकऱ्यांची म्हणत कष्टकऱ्यांच्या कार्याला गणेश देखाव्यातून सलाम करणारे अंबरनाथचे नाडकर कुटुंबिय तसेच श्रीगणेश व व्यासमुनी यांचा महाभारत लेखनाचा देखावा साकारणारे मु,पो. मिळंद - धनगरवाडी व्हाया पाचल, ता. राजापूर जि. रत्नागिरी च्या विजया माने यांचा पुरस्कार स्वीकारणारे विशाल माने, प्रणय माने यांना सन्मानित करण्यास आले.
कार्यक्रमाच्या शेवटी कौतिक दांडगे यांच्या 'महाराष्ट्र बाजार पेठ' च्या वतीने उपस्थित महिला व पुरुषांसाठी विशेष लकी ड्राॅ काढण्यात आले त्याद्वारे आकर्षण बक्षीसे देण्यात आली. या सोहळ्यास द ग्लोबल टाईम्स चे महाराष्ट्रातील..... प्रतिनिधी उपस्थित होते, तसेच ज्येष्ठ पत्रकार राजन परब.स्पर्धेचे परीक्षक हॅशटॅग बाप्पा व छत्रपती फाऊंडेशन चे भरत शिंदे ,सिने नाट्य क्षेत्रातील व जनसंपर्क व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुषार खानविलकर यांच्या मार्गदर्शनात ........संपुर्ण टीमने घेतलेली मेहनत अभिनंदनीय ठरली. या तीन तास चाललेल्या सोहळ्याचे अस्खलित व सुंदर सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
Tejal KhanvilkarWith an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.