'भरत जाधव' वाढदिवस विशेष : अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पहा सदाबहार नाटक ‘श्रीमंत दामोदरपंत’

मुंबई, १२ डिसेंबर २०२५: कधी काळी मराठी रंगभूमी फक्त मनोरंजनाचे व्यासपीठ नव्हते तर ते घराघरांतला आनंद, समाजाचं प्रतिबिंब आणि कुटुंबांना एकत्र बांधणारे नाते होते. त्या काळातील नाटकांनी प्रेक्षकांना फक्त हसवलं नाही, तर त्यांना जगण्याची एक वेगळीच दृष्टी दिली. भरत जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १२ डिसेंबर हा दिवस फक्त त्यांचा वाढदिवस नसून, मराठी मनोरंजनविश्वासाठी एक खास दिवस आहे.  भरत जाधव यांचं सदाबहार नाटक ‘श्रीमंत दामोदरपंत’, जे अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर उपलब्ध आहे. ज्यामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनसोक्त हसण्याच्या धमाल जगात घेऊन जात आहे.

‘श्रीमंत दामोदरपंत’ – नाटकाचे कथानक काय?

दामू हा एक साधा माणूस जो आपल्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत असतो. त्याच्या जीवनात अचानक धमाल उडते जेव्हा संध्याकाळी त्याचे स्वर्गीय आजोबा, श्रीमंत दामोदर पंत यांचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करतात. अशा अप्रतिम कॉमिक टायमिंग कॉमेडीमुळे प्रेक्षकांना हसण्यासारखे अनेक प्रसंग अनुभवायला मिळतील.

नाटकाचे लेखक-दिग्दर्शक 'केदार शिंदे' यांनी या कथेला विनोदी आणि हृदयस्पर्शी रूप दिले आहे.या नाटकाचे निर्माते ज्योती मोहन जोशी आहे. नाटकात दिग्गज अभिनेते भरत जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडकर, रागिनी सामंत, राजीव सावंत यांनी मुख्य भूमिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू सोडली आहे.  त्यांच्या हसव्या आणि भावनिक अभिनयाने नाटकाला एक विशेष ओळख मिळाली आहे.

नाटकात एक अत्यंत लक्षवेधी क्षण म्हणजे जेव्हा भरत जाधव ‘गोड गोजिरी लाज लाजरी’ या गाण्यावर डान्स करत रंगमंचावर एक वेगळी छाप सोडली आहे. हा क्षण नाटकाच्या आनंददायी आणि सजीव वातावरणाला अधिकच रंगीत करतो.

रंगभूमीचा ‘एंटरटेनमेंट पावरहाऊस’ म्हणून ओळखले जाणारे भरत जाधव हास्य, विनोद, टायमिंग, आणि नेहमीच्या माणसाचं सहजसुंदर चित्रण या सर्व गोष्टींमध्ये पारंगत आहेत. त्यांच्या विनोदी शैली, संवादफेक, शरीरभाषा आणि रंगमंचावरची ऊर्जा आजही तितकीच ताजी आहे.

आजच्या ओटीटी च्या युगातही ‘श्रीमंत दामोदर पंत’ सारखं नाटक फक्त टाईमपास नाही तर ते प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील सोप्या, आनंदी दिवसांशी जोडणारा पूल आहे. परंपरा, विनोद हा संगम अल्ट्रा झकास ओटीटी प्रेक्षकांपर्यंत घेऊन येत आहे, आणि आजच्या पिढीला देखील हे नाटक नव्या स्वरूपात अनुभवण्याची संधी मिळते.

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर इतरही लोकप्रिय नाटकांचा संग्रह :

‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘यदा कदाचित भाग १,भाग  २’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘डबल क्रॉस’, ‘मागणी तसो पूरवठो ’, ‘सगळे सभ्य पुरुष’, ‘कुमारी गंगुबाई मॅट्रिक’, ‘सूर्यास्त’ आणि ‘चाळ नावाची खट्याळ वस्ती’ अशी गाजेलेली लोकप्रिय नाटकं देखील अल्ट्रा झकास ओटीटीवर उपलब्ध आहेत. यामुळे रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या जुन्या प्रेक्षकांपासून ते नाटकाची नव्याने ओळख करून घेणाऱ्या तरुणांपर्यंत सर्वांनाच मराठी नाटकांच्या समृद्ध परंपरेचा आनंद पुन्हा अनुभव घेता येईल.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले,

“मराठी नाटकं आणि क्लासिक मनोरंजन जपणं ही काळाची गरज आहे. ‘श्रीमंत दामोदरपंत’ सारखी अनेक सदाबहार नाटकं अल्ट्रा झकास वर उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश म्हणजे हा सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा हा आहे."

एक कलाकार, एक नाटक आणि अविस्मरणीय आठवणी भरत जाधव यांनी मराठी मनोरंजनाला दिलेली देणगी म्हणजे हसण्याचा आणि सकारात्मकतेचा अमूल्य ठेवा. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘श्रीमंत दामोदर पंत’ सारखं नाटक पुन्हा अनुभवणं म्हणजे त्यांच्या कलेचा आदर करणं आहे. कारण काही कथा कधी जुन्या होत नाहीत तर त्या फक्त अनुभवता येतात. 


रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट