अल्ट्रा प्ले आणि अल्ट्रा झकासचे लोकप्रिय क्लासिक सिनेमा आणि वेबसिरीज आता पहा टाटा प्ले बिंजवर
● अल्ट्रा प्ले विविध शैलींतील १,८०० हून अधिक शीर्षकांमधील ५,००० तासांहून अधिक हिंदी चित्रपट व मालिकांचे मनोरंजन देते.
● अल्ट्रा झकास ४,००० तासांहून अधिक मराठी मनोरंजन देते, ज्यामध्ये चित्रपट, नाटक, डब केलेले साऊथ व हॉलिवुड कन्टेन्ट, संगीत यांचा समावेश आहे.
● या सहयोगाला भारतीय मनोरंजन क्षेत्रात ४० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेला वारसा ब्रँड अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटचे पाठबळ आहे.
● टाटा प्ले बिंजने अल्ट्रा प्ले व अल्ट्रा झकाससह ३६ ओटीटी अॅप्सपर्यंत विस्तार केला आहे, ज्यामुळे मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी अद्वितीय गंतव्य बनले आहे.
भारत, १५ डिसेंबर २०२५: भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण मनोरंजन एकाच ठिकाणी देण्याप्रती आपली कटिबद्धता कायम राखत टाटा प्ले बिंजने आपल्या विस्तारित होत असलेल्या ओटीटी पोर्टफोलिओमध्ये अल्ट्रा प्ले आणि अल्ट्रा झकास या दोन नवीन अॅप्सची भर करण्याची घोषणा केली आहे. हा सहयोग टाटा प्ले बिंजच्या हिंदी व मराठी कन्टेन्ट ऑफरिंग्जना प्रबळ करतो, तसेच देशभरातील प्रेक्षकांना विविध भाषांमधील कन्टेन्टचे मनोरंजन देतो.
अल्ट्रा मीडिया प्रा. लि. चे हिंदी-भाषिक ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट्रा प्ले भारतीय चित्रपटसृष्टीच्या सात प्रमुख व्यावसायिक शैलींतील १,८०० हून अधिक शीर्षकांमधील ५,००० तासांहून अधिक रेट्रो कन्टेन्टचे मनोरंजन देते. लायब्ररीमध्ये १९४३ पासून आजपर्यंतचे सुपरहिट हिंदी चित्रपट, वेब सिरीज, हिंदीमध्ये डब केलेले साऊथ इंडियन ब्लॉकबस्टर्स व हॉलिवुड चित्रपटांचा समावेश आहे, ज्यासह अल्ट्रा प्ले भारतातील व जगभरातील ६०० दशलक्षहून अधिक हिंदी-भाषिक प्रेक्षकांच्या मनोरंजन गरजांची पूर्तता करते. लोकप्रिय शीर्षक आहेत 'क्रिश', 'गदर एक प्रेम कथा', 'दबंग', 'कहो ना प्यार है' '३ इंडियट्स', 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'अंदाज अपना अपना', 'गजनी' आणि गुरू दत्त, राज कपूर व राजेश खन्ना यांचे सदाबहार चित्रपट.
अल्ट्रा मीडियाची मराठी ओटीटी ऑफरिंग अल्ट्रा झकास ४,००० तासांहून अधिक मराठी मनोरंजनासह महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीला साजरे करते. या अॅपच्या कॅटलॉगमध्ये १,५०० हून अधिक शीर्षकांचा समावेश आहे, ज्यामध्ये लोकप्रिय मराठी चित्रपट, नाटक, ओरिजिनल्स, डब केलेले साऊथ व हॉलिवुड चित्रपट, लहान मुलांचे मनोरंजन, संगीत आणि टीव्ही मालिका आहेत. दर आठवड्याला नवीन रीलीजसह अल्ट्रा झकास मराठी कथानक व कलेला नव्या उंचीवर घेऊन जाईल, जेथे जगभरातील प्रेक्षकांना 'बेटर हाफची लव्ह स्टोरी', 'जिलेबी', 'एक डाव भूताचा', पुरस्कार-प्राप्त वेब सिरीज 'आयपीसी', 'सौभाग्यवती सरपंच' अशा कन्टेन्टचे मनोरंजन मिळेल.
या एकीकरणासह, टाटा प्ले बिंजचे आता विविध भाषा व शैलींचे व्यापक मिश्रण आहे, जेथे एकाच ठिकाणी ३६ अॅप्स असलेले भारतातील सर्वसमावेशक ओटीटी अॅग्रीगेशन प्लॅटफॉर्म म्हणून त्यांचे स्थान अधिक प्रबळ होत आहे. दोन्ही नवीन प्लॅटफॉर्म्स टाटा प्ले बिंज अॅपच्या माध्यमातून स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असतील, ज्यामधून सबस्क्रायबर्सना सुलभ व एकत्रित व्युइंग अनुभव मिळेल.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत टाटा प्लेच्या चीफ कमर्शियल अँड कन्टेन्ट ऑफिसर पल्लवी पुरी म्हणाल्या, ''२०२५ मध्ये टाटा प्ले बिंजने आपला कन्टेन्ट पोर्टफोलिओ वाढवणे सुरूच ठेवले आहे, जेथे एकाच प्लॅटफॉर्मवर भारतातील वैविध्यपूर्ण मनोरंजन क्षेत्राला एकत्र आणत आहे. भर करण्यात आलेले अल्ट्रा प्ले आणि अल्ट्रा झकास आमच्या हिंदी व मराठी ऑफरिंग्जना अधिक प्रबळ करतात, तसेच प्रेक्षकांना सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न चित्रपट, मालिका व वेब सिरीजची व्यापक श्रेणी सहजपणे उपलब्ध असण्याची खात्री देतात. टाटा प्ले बिंजमध्ये आम्ही कन्टेन्ट निर्माण करण्याप्रती कटिबद्ध आहोत, जे भारतातील बहुभाषिक व सर्जनशील विविधतेला साजरे करतात, तसेच प्रत्येक प्रेक्षकाला सहजपणे मनोरंजनाचा आनंद देतात.''
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंट प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, ''२०२५ मध्ये, टाटा प्ले बिंजमध्ये भर करण्यात आलेले अल्ट्रा प्ले आणि अल्ट्रा झकास भारतभरातील प्रेक्षकांसाठी एकाच, युजर-अनुकूल प्लॅटफॉर्मवर प्रीमियम हिंदी व मराठी मनोरंजन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा सहयोग आमच्या कालातीत क्लासिक, ब्लॉकबस्टर चित्रपट व ओरिजिनल वेब सिरीजच्या क्यूरेटेड लायब्ररीची पोहोच वाढवतो, तसेच भारतीय कथानकाच्या संस्कृतीला अधिक संपन्न करतो. अल्ट्रामध्ये आम्हाला उच्च दर्जाचे, प्रादेशिक संबंधित कन्टेन्ट वितरित करण्यासाठी टाटा प्ले बिंजसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे, देशभरातील प्रेक्षकांना मनोरंजन देतात, त्यांच्याशी संलग्न होतात आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीला साजरे करतात.''
या ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन कसे मिळवावे असा विचार करत आहात? आम्ही तुमच्यासाठी टाटा प्ले बिंज घेऊन आलो आहोत. प्रेक्षक ३० हून अधिक अॅप्सच्या संपूर्ण पॅकेजचा आनंद घेऊ शकतात, ज्यामध्ये प्राइम व्हिडिओ, जिओहॉटस्टार, झी५, अॅप्पल टीव्ही+, लायन्सगेट, फॅनकोड, टाइम्स प्ले, अहा, सनएनएक्सटी, डिस्कव्हरी+, बीबीसी प्लेअर, शेमारूमी, हंगामा, एपिकॉन, चौपाल, स्टेज, वेव्ह्ज, क्लिक, मनोरमामॅक्स, नम्माफ्लिक्स, आयस्ट्रीम, पीटीसी प्ले, तरंग प्लस, रील्सड्रामा, प्लेफ्लिक्स, डॉक्यबे, ट्रॅव्हल एक्सपी, व्हीरॉट, अॅनिमॅकस, हॉलमार्क+, फ्यूज+, शॉर्ट्स टीव्ही, क्यूरोसिटी स्ट्रीम, डिस्ट्रोटीव्ही आणि गेम्स यांचा समावेश आहे. या प्लॅटफॉर्म्समधील कन्टेन्ट सिंगल सबस्क्रिप्शन आणि सिंगल युजर इंटरफेसच्या माध्यमातून टाटा प्ले बिंजच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. तसेच, सर्व टाटा प्ले डीटीएच सबस्क्रायबर्ससाठी डीटीएच चॅनेल्ससोबत कॉम्बो पॅक म्हणून नेटफ्लिक्स उपलब्ध होऊ शकते, तर डीटीएच कनेक्शन असलेल्या सर्व टाटा प्ले बिंज सबस्क्रायबर्सकरिता अॅड-ऑन म्हणून अॅमेझॉन प्राइम कन्टेन्ट उपलब्ध होऊ शकते. प्रेक्षक एलजी, सॅमसंग व अँड्रॉर्ठड स्मार्ट टेलिव्हिजन्सच्या माध्यमातून, तसेच टाटा प्ले बिंज+ अँड्रॉईड सेट टॉप बॉक्स, अॅमेझॉन फायबर टीव्ही स्टीकचे टाटा प्ले एडिशन आणि www.TataplayBinge.com च्या माध्यमातून मोठ्या स्क्रिन कनेक्टेड डिवाईसेसवर सर्व ३० हून अधिक अॅप्सचा आनंद घेऊ शकतात.
३० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी टाटा प्ले बिंज अॅप डाऊनलोड करा
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
Tejal KhanvilkarWith an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.