कोण आहेत मुंबईचे मराठी माणसांचे गुन्हेगार? ये जो पब्लिक है, ये सब जानती है!

नगरपालिकांच्य निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेलेय आणि आता मुंबईत जमिनीवरची मातीतली एकमेकांना मातीत लोळवण्याची, अस्मान दाखवण्याच्या तयारीला तेल लावलेले, पहलवान कामाला लागलेले दिसू लागलेत ! कधी काळी एकत्र असणारे मित्रपक्ष, मिळून सत्ता भोगणारे एकमेकांविरोधात उभे ठाकले !


महाराष्ट्रातील आणि विशेषतः मुंबईतली माणसं खुळी नाहीत, त्यांनी अनेक संकटं आणि हल्ले पचवलेत, त्यामुळे कोणत्याही प्रचार प्रसाराचे परिणाम तिच्यावर होणार नाही.

मुंबईत अनेक वर्षांपासून शिवसेना मनपात सत्तेत होती. सोबत भाजपाही होती. अनेक प्रोजेक्ट दोघांनी मिळून केलेत. त्यामुळेच एकमेकांचे बारकावे त्यांना माहिती आहेत... पण कालपासून जे पोस्टर वॉर मुंबईत सुरु झालेय... ते पहाता... मुंबईकर मराठी माणूस म्हणतोय, आम्ही सगळं पहातोय आणि अनुभवतोय. मुंबईचा वाली खरा मराठी, आणि मराठी मूळ रहिवाशांच्या जागा न लाटता, त्यांना मुबईकरांना मुंबईत सन्मानाने जगू देईल तो आमचा तारणहार असणार आहे... पण ही राजकीय निवडणुकीची लढाई जणू नळावरच्या भांडणासारखी रुप घेऊ लागलीय !

जनता चिंतीत असली तरी हीच ती वेळ हाच तो क्षण ज्याची आम्ही वाट पहात होतो. ..रात्र नाही जगणेच वै-याच्या हाती जाऊ देणार नाही. हे त्यांनी निश्चित ठरवलंय, इथे गोबेल तंत्र, फेक नरेटिव्ह चालणार नाहीत हे मुंबईवाल्यांनी नक्की ठरवलंय! याचं भान एकमेकांवर काहीही बोलून चॅनल्सवर बकबक करणार्यांनी ठेवायला हवी. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, गावपातळीवरचे तंत्र कामाचे नाही. आणि जर प्रचाराची पातळी घसरली तर अगदी उलट घडू शकतं हे सर्व पक्षांनी लक्षात घ्यायला हवंच! इथे पक्षापेक्षा त्या त्या वॉर्ड मधे काम करणारी आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारी व्यक्ती महत्त्वाची नि सरस ठरणार आहे. आणि म्हणूनच निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.

निवडणुकांसाठी राजकीयपक्ष कामाली लागले आहेत. मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा मुकाबला होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये युती करुन लढणार आहे. विशेष म्हणजे यासाठीची वातावरण निर्मिती जमिनीवर सुरु झालेली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मागाठाण्यातील अनेक प्रभागांमध्ये गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी काळ्या रंगांचे पोस्टर लागले आहेत. लहान मोठ्या आकाराचे कागदी पत्रक प्रभाग लावण्यात आले आहेत. दहिसर पूर्वेकडे असलेल्या रावळपाड्याच्या अखेरच्या बस थांब्यापासून ते अगदी बोरीवली रेल्वे स्थानकापर्यंत कागदी पत्रक लागले आहेत.

'मराठी माणसा जागा हो ! रात्र वैऱ्याची आहे! ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे!', असा मजकूर पोस्टरवर आहे. 'पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते. मराठी माणसा मुंबई वाचव! ही तुझ्या अस्तित्त्वाची लढाई आहे. यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल!', असं आवाहन पोस्टरमधून करण्यात आलं आहे. 'मराठी माणसा जागा हो! तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे! यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल!', असे पोस्टर लावण्यात आहेत.

पश्चिम उपनगरात येणाऱ्या दहिसर पुर्वेतील रावळपाडा, अशोकवन, बोरिवली पूर्वे तील सावरपाडा, बोरिवली रेल्वे स्थानक, कांदिवली पश्चिमेच्या चारकोप भागात अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर कोणत्याही पक्षाचा, नेत्याचा उल्लेख नाही. त्यामुळे त्याबद्दलचं गूढ कायम आहे. जमीन परत गेली की परत मिळत नसते, ही अखेरची संधी, असे शब्द मनसे प्रमुख राज ठाकरेंनी गेल्या काही महिन्यांत बऱ्याचदा वापरले होते. त्यामुळे या पोस्टरमागे मनसेच, अशी चर्चा परिसरातील रहिवाशांमध्ये आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४, ५, ११, १८ मध्ये कागदी पत्रक चिकटवण्यात आले आहेत. या सगळ्या जागा २०१७ मध्ये शिवसेनेनं जिंकल्या होत्या. यापैकी प्रभाग क्रमांक ४ चा अपवाद सोडता अन्य सगळ्याच प्रभागाचे माजी नगरसेवक शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ठाकरेसेनेसमोर मोठं आव्हान आहे.

निवडणुकीची घोषणा होताच ठाकरे बंधूविरोधात मुंबईमध्ये बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स कुणी लावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेच ठाकरे बंधुंना लक्ष्य करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईत ठाकरेंविरोधात बॅनर्स लावले गेले असून, त्यावर हिंदुत्व, घराणेशाही आणि मुंबई महापालिकेची सत्ता या तीन मुद्यांवर बोट ठेवण्यात आलं आहे.

दक्षिण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर जे हिंदुत्वाचे नाही झाले, ते मराठी माणसांचे काय होणार! मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नांदी लागू नको असं म्हटलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी द्विष्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईत ठाकरेंच्या लागलेल्या फलकावर आशिष शेलार यांनी ट्रीट करत जोरदार चिमटा काढला आहे.

मराठी माणसाने तुम्हाला हरवण्याचा शुभ मुहूर्त काढला आहे. होर्डिंग लावून कोण तरी मराठी माणसाला उठवतोय. लबाड बोक्यांनो तुम्हाला हरवण्याची संधी शोधतोय. आता तारीख ठरली... वार ही ठरला असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरेंना टोला लगावला. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या द्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्रीट केलं आहे. मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढला!! मुंबईचे मारेकरी कोण? मराठी माणसाला आता कळून चुकलेय. त्याने मुंबईला वाचवायचेय स्वतःच ठरवून ठेवलेय। डोळे मिटून यांनी पालिकेत २५ वर्षे खा.. खा.. खाल्ले, राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले. आता यांना मराठी माणूस आठवतोय. काय गंमत पहा भाजपाचे जे नेते शिवसेने सोबत होते तेच ही भाषा वापरत आहेत.

एक गोष्ट ऐरणीवर आलीय की मुंबईतल्या मराठी माणसांच्या कोळ्यांच्या मूळ मराठी माणसांच्या जागा, जगण्यावर आणि सांस्कृतिक क्षेत्रावर आक्रमक करणारे आणि त्यांना मुंबई बाहेर विस्थापित करणारे कोण आहेत? मराठी माणूस त्यांची अस्मिता अपमानित करणारे, आपल्या पोळ्या शेकणारे डाकू कोण आहेत हे बाहेर येणे आवश्यक आहे. या लढाईच्या निमित्ताने मराठी माणसांच्या अपमान, सन्मानीत जगणे नाकारण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय, या विषयाचा पर्दाफाश कोण करणार हा कळीचा मुद्दा आहे.

आणि हे काम जो करणार तो या लढाई तला नायक ठरणार मग ती व्यक्ती स्त्री

असो की पुरुष !

असं काही होणार नाही.

पण मुंबईकर जागे आहेत हे नक्कीच !

लढाई होण्यात पण मर्यादा राखून याचे भान प्रत्येकाला असायला हवेच!

कोण होतास तू काय झालास तू हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा, म्हणजे किमा...न मुंबई व महाराष्ट्रातल्या मराठी आणि मूळ नागरिकांना बरे दिवस येतील.

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट