॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

RAMP अंतर्गत रत्नागिरी येथे MSME उद्योजकांसाठी विशेष व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

रत्नागिरी, दि. ६ जून २०२६ : भारत सरकारच्या RAMP (Raising and Accelerating MSME Performance) उपक्रमांतर्गत, महाराष्ट्र शासन, MSSIDC आणि झेप उद्योगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व पुरुष उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेला विशेष MSME व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम रत्नागिरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह, व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्ह्यातील महिला व पुरुष उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयंरोजगार इच्छुक युवक-युवती तसेच विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योजकांना MSME क्षेत्रातील विविध शासकीय योजना, वित्तीय सहाय्य, सरकारी खरेदी प्रक्रिया, GeM पोर्टल, NSIC योजना, बँकिंग सुविधा, पॅकेजिंगचे महत्त्व आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून

⚜️ पूर्णिमा शिरीषकर यांनी महाराष्ट्र शासनांतर्गत MSME क्षेत्रासाठी उपलब्ध सवलती, अनुदाने आणि विविध शासकीय योजनांची माहिती दिली. 

⚜️विवेक शिंदे यांनी Government Tender प्रक्रिया, GeM पोर्टल आणि सरकारी खरेदीमधील व्यवसाय संधी यावर मार्गदर्शन केले.

⚜️डॉ. सुबोध जुईकर (Joint Director, Indian Institute of Packaging) यांनी आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञान, उत्पादन मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी पॅकेजिंगचे महत्त्व स्पष्ट केले.

⚜️इकबाल अन्सारी यांनी NSIC च्या विविध योजना, SC/ST Hub उपक्रम तसेच उद्योजकांसाठी उपलब्ध सहाय्य व अनुदान योजनांची माहिती दिली. तर 

⚜️माधुरी नाईक (शाखा व्यवस्थापक, SBI बँक, रत्नागिरी) यांनी MSME उद्योगांसाठी उपलब्ध बँक कर्ज योजना, वित्तपुरवठा आणि आर्थिक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

⚜️अक्षय सालुखे - महाराष्ट्र शासन जिल्हा उद्योग केंद्र विभाग- PMEGP , CMEGP लोन व सबसिडी योजना ही समजवली 

कार्यक्रमादरम्यान सहभागी उद्योजकांनी विविध विषयांवर प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. उपस्थित उद्योजकांनी कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरल्याचे मत व्यक्त केले.

झेप उद्योगिनी, MSSIDC आणि RAMP उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यातही उद्योजकांसाठी अशा प्रकारचे क्षमता विकास व व्यवसाय वृद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट