सिकलसेल तपासणी करून घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन.

ठाणेः राज्यामध्ये सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सन २००८ पासून आदिवासी व दुर्गम भागात प्रभावीपणे राबविण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती सप्ताह दिनांक ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

Sickle Cell Disease Symptoms, Types and Complications           Sickle Cell Disease - Sangamo     Gene Therapy for Sickle Cell Anemia in India - Current Status and  Challenges | Indian Journal of Hematology and Blood Transfusion

उपक्रम जिल्हाधिकारी ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यात सध्या ११४ सिकलसेल रुग्ण असून १,८५७ वाहक आढळून आले आहेत. सिकलसेल जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण २,८१० तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये २ वाहक व १ सिकलसेल   बाधित रुग्ण आढळून आला आहे.

या जनजागृती सप्ताहाअंतर्गत नागरिकांमध्ये सिकलसेल आजाराविषयी माहिती व जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत असून, मोफत सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस व क्ाडउ तपासणी, सिकलसेल रुग्णांना मोफत औषधोपचार, समुपदेशन, नियमित आरोग्य तपासणी, गरजेनुसार रक्त संक्रमण तसेच टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, सिकलसेल हा एक अनुवंशिक आजार असून तो आई-वडिलांकडून अपत्यांमध्ये संक्रमित होतो. त्यामुळे विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. वाहक -वाहक किंवा वाहक रुग्ण विवाह टाळल्यास सिकलसेल आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकतो. तसेच सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर लवकरात लवकर गर्भजल तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. सिकलसेल रुग्णांसाठी शासनामार्फत विविध सवलती व लाभ देण्यात येत असून त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना अंतर्गत दरमहा २,५०० आर्थिक सहाय्य, इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अतिरिक्त वेळ, तसेच उपचारासाठी एस.टी. बस प्रवास सवलत यांचा समावेश आहे.

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट