इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत.....

रत्नागिरी : सध्या सरकारने कोकणच्या निसर्गाचा लाभ घेत पर्याटन व्यवसाय पुढे आणण्याचा गवगवा सुरु के ला होता. यापूर्वी कोकणात अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प उभारण्यास येथील स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध के ला. त्यानंतर हे प्रकल्प गुंडाळण्यात आले; पण आता पुन्हा एकदा कोकणाच्या माथ्यावर इटलीमधून हकालपट्टी करण्यात आलेला घातक विषारी रासायनिक पदार्थ बनवणाऱ्या प्रकल्पाला पायघड्या घालण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे एमआयडीसीत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आह.यामुळे पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी, शेतकरी, बागायतदार तसंच मच्छीमारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.इटलीमधून हद्दपार के लेली, हाकलण्यात आलेल्या ‘मिटेनी एस.पी.ए.’ ही रासायनिक कं पनी अप्रत्यक्षपणे भारतात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत लक्ष् ऑरगॅनिक या नावाने सुरू आहे.

Ratnagiri: प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये पाहणी  Ratnagiri Marathi News | Pollution control officials inspect Lakshmi Organic  Company in Lotte Industrial Estate | Latest ...

इटलीमधून हाकलण्यात आलेला या कं पनीला कोकणात पायघड्या घालण्यात आल्या आहेत. इतकं च नाही तर या कं पनीतून काही अंशी प्रोडक्शनही सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इथे प्रोडक्शन सुरू झाल्याच्या माहितीला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण येथील सूत्रांन  दुजोरा दिला आहे. एकूण वीस उत्पादनांपैकी दोन प्रॉडक्ट सुरू करण्यात आले आहेत. या केमिकल कं पनीमधून ‘पीएफएएस’ या अत्त घातक विषारी रासायनिक पदार्थाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र त्यातील वेस्टेज हे तळोजा येथे नेऊन एक हजार डिग्रीला नष्ट केलं जात असल्याची माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सूत्रांनी दिली आह.लोटे येथील रासायनिक प्रदूषणाच्या विळख्यामुळे आधीच या परिसरातील शेती, आंबा, काजूच्या बागा गेली कित्येक वर्ष अडचणीत आहेत. अनेकदा श्वसनाचे आजार या परिसरातील नागरिकांना अनेकदा उद्भवतात. असं असतानाही घातक असलेले विषारी रसायनिक पदार्थ बनवणारी आणि इटलीतून हकालपट्टी के लेली कं पनी आमच्या परिसरात कशासाठी? असाही संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट