समर्थयोगी : स्वामीभक्तीचा अलौकिक आणि प्रेरणादायी प्रवास !

श्री स्वामी समर्थ मठ, भुईगाव (वसई) यांवर आधारित छबूबाई व्यंकटराव सांडवे निर्मित आणि चंद्रशेखर सांडवे लिखित-दिग्दर्शित नवीन चित्रपट "समर्थयोगी" दि. २२ डिसेंबर ला YouTube या माध्यमावर प्रदर्शित झालेला आहे. चित्रपटाचे कथानक स्वामीभक्त श्री. संदीपदादा म्हात्रे यांच्या संपूर्ण परिवाराचे जीवन, त्यांची दत्तभक्ती, स्वामीभक्ती आणि साक्षात श्री. स्वामी समर्थ महाराजांकडून लाभलेले दृष्टांत आणि त्यांतून उभारलेला श्री स्वामी समर्थ मठ, भुईगावं यावर आधारित आहे.
वडील तात्या यांनी रुजवलेले स्वामी भक्तीचे संस्कार संदीपदादांवर लहानपणापासून होते. पुढे जाऊन त्याचा प्रसार आणि प्रचार त्यांनी जोमाने वाढवला आणि आसपासचा संपूर्ण परिसर, गाव हा स्वामीभक्तीत लीन झाला. स्वामींप्रती असलेली असीम भक्ती आणि निष्ठा यांच पुण्यफळ म्हणून साक्षात श्रीस्वामी समर्थ महाराजांनी त्यांना अनेकदा आयुष्यात आशीर्वाद आणि दृष्टांत दिले व लोकमाध्यमांतून श्रीस्वामी समर्थ मठ, भुईगावं याची स्थापना करवून घेतली. या संपूर्ण वाटचालीत त्यांना श्री गजानन महाराज, श्री शंकर महाराज, श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या लक्ष्मीरूपाचे देखील दर्शन घडले. मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, अन्नछत्र, गोशाळा, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक अथवा वस्तुरूपी मदत अशी अनेक लोकोपयोगी कामे आज त्यांच्या हातून पार पडत आहेत.

                              

देवा दोन मी पदरी धरा ॥ ध्रु ॥
कलियुगीं श्रीदत्तात्रेय । अवतार तुमचा खरा ।। देवा ॥ १ ॥
अक्कलकोटनिवासी ब्रह्म । सगुण हृर्दाय उतरा ।। देवा ॥ २ ॥
श्रीज्ञानेश्वर रूप धरूनी। शिरीं ठेवा स्वकरा ।। देवा ॥३ ॥
भक्तिभावानें ओथंबलेलें हें भावमधुर पद विदर्भातील अंध सत्पुरुष श्रीपांडुरंगनाथ ऊर्फ गुलाबराव महाराज यांचें आहे. श्रीगुलाबराव महाराज हे साक्षात् श्री ज्ञानदेव माऊलींचेच अवतार ! 'प्रत्यक्ष ज्ञानेश्वर विभूति। जगामाजीं प्रकटली' असें त्यांचें माहात्म्य.
श्रीदत्तात्रेयांचे सोळा अवतार व त्यानंतर इतिहास काळांतील श्रीपादवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, श्रीमाणिक प्रभु व श्रीअक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रमुख अवतारी पुरुष आहेत. श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्यासारखे इतर अंशावतार तर अनेक आहेत. या सर्वांनीं श्री दत्तात्रेयांचें लोकोद्धोराचें कार्य केलें आहे. श्रीअक्कलकोटस्वामीमहाराज यांचे नांव अखिल महाराष्ट्रांत अत्यंत पूज्यभावानें घेतले जातें. श्रीस्वामीसमर्थांचें, अनंत चमत्कार व लीलांनी नटलेलें अत्यद्भुत चरित्र वाचतांना 'स्वामी म्हणजे चमत्कार' असा कुणाचा ग्रह होणें साहजिक आहे. परंतु चमत्कार हे कांहीं श्री स्वामींसारख्या अवतारी विभूतीचें अवतारकार्य नव्हे ! त्यांचा अवतार लोकोद्धारासाठीं वा धर्मरक्षणासाठीं आहे. या कार्याला त्यांचे चमत्कार किंवा त्यांच्या सहजलीला पोषक ठरत असतात इतकेंच ! श्री स्वामी समर्थांनीं आपल्या अवतारकार्यात प्रसंगानुरूप आपल्या भक्तांना जो उपदेश केला तो एकत्रित स्वरूपांत साररूपानें चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
"समर्थयोगी" या संपूर्ण चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सांस्कृतिक कलादर्पणचे संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांनी केले आहे. चित्रपटाची पटकथा आणि दृश्य यांचा समन्वय अगदी छान पद्धतीने मांडला आहे. चित्रपटातील पात्रांचे संवाद योग्य पद्धतीने विस्तारलेले आहेत, कुठेही अतिशयोक्ती आढळत नाही.
चित्रपटात दाखवलेली दृश्ये विविध ड्रोनच्या माध्यमातून छायाचित्रित केली आहेत ही या चित्रपटाची जमेची बाजू नक्कीच ठरलेली आहे. चित्रपट पाहतांना प्रेक्षकांना भक्तिरसाचा अनुभव देतो.
चित्रपटात श्री संदीपदादा म्हात्रे यांच्यावर आधारित असणाऱ्या पात्राची प्रमुख भूमिका चंद्रशेखर सांडवे यांनी केली आहे. तर श्रीस्वामी समर्थ महाराज यांची  अजरामर भूमिका चित्रपट-मालिका क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी साकारलेली आहे, तसेच श्री गजानन महाराजांचे चरित्र मालिकांद्वारे घराघरांत पोहचवणारी भूमिका अमित फाटक यांनी केली आहे, चित्रपटातील श्रीस्वामी समर्थ महाराजांचे लक्ष्मीरुप ही भूमिका अभिनेत्री सानिका मोजर हिने साकारली आहे. सहकलाकार सुबोध पवार आणि प्रकाश राणे तसेच अन्य सहकलाकारांनी देखील उत्तम साथ दिली आहे.

लेखन-दिग्दर्शन : चंद्रशेखर सांडवे
निर्मिती : छबूबाई व्यंकटराव सांडवे
सहनिर्मिती : प्रकाश राणे, विवेक पर्वते
संगीत : प्रकाश राणे
वेशभूषा : ज्योती सांडवे
कला दिग्दर्शक : स्वयंभू सांडवे
क्रिएटिव्ह दिग्दर्शक : तन्मय सांडवे
कार्यकारी निर्माता : सर्वेश सांडवे
संकलन : रिगवीट प्रॉडक्शन, रितेश पाटील
टायटल-पोस्टर डिजाईन : निखिल मालुसरे

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट