कमी खर्चात प्रभावी उपचार : नवी मुंबई, ऐरोली येथे सहयोग होमिओपॅथिक हॉस्पिटलचे उद्घाटन. कामोठे मध्ये रेल्वे स्थानक परिसर व अग्निशमन दलासाठी राखीव प्लाॅट वरती अतिक्रमणाविरोधी कारवाई Kavach Commissioned of in Prayagraj – Kanpur Section of NCR २०२६ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे जागतिक झुकाव वेगाने; वाहन उद्योगात मोठा बदल डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

कामोठे मध्ये रेल्वे स्थानक परिसर व अग्निशमन दलासाठी राखीव प्लाॅट वरती अतिक्रमणाविरोधी कारवाई

पनवेल,दि.२२: पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत अतिक्रमण विभागाच्या वतीने कामोठे येथील मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमणाविरोधी कारवाई करण्यात आली. तसेच अग्निशमन दलासाठी राखीव असलेल्या प्लॉटवर झालेले अतिक्रमण हटविण्यात आले.


आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार मानसरोवर स्थानक परिसरात अनाधिकृतपणे उभारण्यात आलेल्या टपऱ्या व झोपड्यांवरती जेसीबीच्या सहाय्याने प्रभाग समिती ‘क’ च्या अतिक्रमण विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली. संबंधित विभागाच्या पथकाने नियोजनबद्धरीत्या ही मोहीम राबवून परिसर अतिक्रमणमुक्त केला.


याचबरोबर कामोठे येथील अग्निशमन दलासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या प्लाॅटवरती अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या, स्टाॅल्स उभारण्यात आले होते. उपायुक्त नानासाहेब कामठे व सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिक्षक दशरथ भंडारी यांनी जेसीबीच्या सहाय्याने याठिकाणी तोडक कारवाई करून संपूर्ण प्लाॅट रिकामा केला.


महापालिकेच्या वतीने अशा प्रकारच्या अनधिकृत अतिक्रमणांवरती पुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिका 

जनसंपर्क विभाग 

दिनांक: २२-०३-२०२६

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट