पेण शहरात 'अंमली पदार्थांचा' खुला बाजार ? महिला अटकेत
पेण : पेण शहरात अंमली पदार्थाची
खुलेआम विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत ३८ वर्षीय महिलेला तब्बल १ किलो २९८ ग्रॅम गांजासह अटक केली. या घटनेमुळे शहरातील वाढत्या इम्ज नेटवर्कवावत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगरपालिका मैदानाजवळील खाऊ गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अंजली यादव या महिलेला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान तिच्याकडून मोठ्या
प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला असून सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पेणमध्ये यापूर्वीही अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र, या प्रकरणात एका महिलेचा सहभाग उघड
झाल्याने शहरात नव्या चचांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, महिलांसह नवतरुण मुलीही या जाळ्यात अडकत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, शहरात बाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या व्यवहारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच निष्पाप महिला आणि तरुणी चुकीच्या मार्गाला लागू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असून, रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav