Interior / upgardation of Next-Generation Amrit Bharat Coaches. Sample coach ready
- Apr 06, 2026
- 99 views
भरधाव जिपने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने संजय जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू;
पेण पोलीस ठाण्यात २७ वर्षीय चालकावर गुन्हा दाखल!
पेण : पेण तालुक्यातील खोपोली बायपासवर रविवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एका कुटुंबप्रमुखाचा नाहक बळी गेला. भरधाव वेगात आणि हलगर्जीपणाने चालवलेल्या कंपास जिपने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने राधाकृष्ण वाडी येथील ५५ वर्षीय संजय सदाशिव जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या अपघाती घटनेत २७ वर्षीय अर्चीत सुबोध गाडगिळ नामक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे २:०० वाजता हा अपघात झाला. संजय जाधव हे त्यांची ज्युपीटर स्कुटी (क्र. एमएच ०६ सीएफ ५८९२) घेऊन राधाकृष्ण वाडीकडून यू-टर्न घेऊन पेणच्या दिशेने येत होते. त्याचवेळी खोपोलीहून तरणखोप लेनवरून पेणकडे येणाऱ्या जिप - कंपास कार (क्र. एमएच ०६ सीयू ३९१९) च्या चालकाने अत्यंत वेगाने व हलगर्जीपणाने वाहन चालवत. रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालकाने संजय जाधव यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की संजय जाधव यांना डोक्याला मार लागून लहान-मोठ्या गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने हॉस्पिटल उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
*पोलिसांची कारवाई*
या प्रकरणी मयत संजय जाधव यांच्या मुलाने पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पेण पोलिसांकडून आरोपी चालक अर्चीत गाडगिळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे करत आहेत. *स्थानिकांचा संताप, प्रशासनावर प्रश्नचिन्ह* काही वेळा खोपोली बायपासवर वाहनांचा वेग प्रचंड असतो. यू-टर्न आणि क्रॉसिंगच्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांनी या आधी ही या मार्गावर गतिरोधक बसवणे व वेगमर्यादा फलक लावण्याची मागणी केली आहे.भरधाव वाहनांमुळे निष्पाप बळी जाण्याच्या घटनांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी जोर धरत आहे. संजय जाधव यांच्या अकस्मात निधनाने पेणसह राधाकृष्ण वाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. एका क्षुल्लक हलगर्जीपणामुळे कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav