‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने' अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी.

                                                            १५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहार राज्यातील बोधगया येथे तीर्थदर्शन यात्रा आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेसाठी इच्छुक व पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले असून दि. १५ मे २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असून त्यांचे वय ६० वर्षे किंवा त्यावरील असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच शासन निर्णयातील इतर अटी व शर्ती लागू राहणार असून लाभार्थी प्रवासासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. या यात्रेसाठी प्रवास, निवास व भोजनाची सुविधा शासन नियमानुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच यात्रेत सहभागी होता येईल. ७५ वर्षांवरील अर्जदारांना त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एका व्यक्ती सोबत नेण्याची परवानगी देण्यात येणार आहे. अपूर्ण अथवा अपात्र अर्ज विचारात घेतले जाणार नाही तसेच अर्जामध्ये खोटी माहिती आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रक नमूद करण्यात आले आहे.

रिपोर्टर

  • Sanket Jadhav
    Sanket Jadhav (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Sanket Jadhav

संबंधित पोस्ट