राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाची चमकदार कामगिरी; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.
श्रीवर्धन : दि. १२ मे : श्रीवर्धन तालुक्यातील युवा कराटेपटू कु. विहान दर्शन विचारे याने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. उत्तराखंड राज्यातील देहरादून येथे जून महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून, श्रीवर्धन तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
दि. ९ आणि १० मे २०२६ रोजी नाशिक येथील जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर, कॅडेट आणि ज्युनियर कराटे अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात पार पडली. राज्यभरातून जवळपास २,००० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्रीवर्धनच्या चॅम्पियन्स कराटे क्लबच्या कु. विहान दर्शन विचारे याने +४५ किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे जून महिन्यात देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. विहानने यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची प्रभावी छाप पाडली होती. यंदाही राष्ट्रीय पातळीवर श्रीवर्धनचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
इतर विद्यार्थ्यांचीही उल्लेखनीय कामगिरी
या स्पर्धेत चॅम्पियन्स कराटे क्लबच्या इतर विद्यार्थ्यांनीही दमदार यश संपादन केले.
कु. मीरा सुहास साखरे – रौप्यपदक (-३० किलो गट)
कु. श्रेयस प्रकाश कोठावळे – कांस्यपदक
कु. आराध्या रितेश मुरकर – कांस्यपदक
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे श्रीवर्धनच्या कराटे क्षेत्रातील वाढती गुणवत्ता अधोरेखित झाली आहे. प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन या यशामागे संस्थेचे संस्थापक शिहान संतोष मोहिते यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. तसेच सेन्सेई अविनाश मोरे, प्रसाद विचारे, रितेश मुरकर आणि अनिकेत साखरे यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव विहानच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडाप्रेमी, पालक आणि नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही तो सुवर्णपदक पटकावत श्रीवर्धन व महाराष्ट्राचे नाव देशभरात उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.श्रीवर्धन तालुक्याच्या क्रीडा इतिहासात विहानची ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरली आहे.
रिपोर्टर
Sanket Jadhav (reporter)
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav