‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पुण्यात विषारी दारूकांडाचा थरार १५ जणांचा मृत्यू .


पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूच्या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हातभट्टीच्या विषारी दारूचे सेवन केल्यानंतर तोंडाला फेस येऊन अनेकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिकांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे समजते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दारुकांडप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहे. फुगेवाडीत एकूण ८ जणांचा तर हडपसर येथे ७ जणांचा या विषारी दारुमुळे मृत्यू झाला आहे.                                                                                                                                             

 नेमकं काय आहे प्रकरण?

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारुच्या सेवनाने सुरुवातीला 8 जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील काळेपडळ आणि हडपसर भागात पाच जणांनी जीव गमावला आहे. या प्रकरणामागे योगेश वानखेडे नावाच्या सराईत दारू विक्रेत्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर याञ्जाधीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

तोंडाला फेस येताच मृत्यू, परिसरात भीतीचं वातावरण

दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ भागातील अनेकांनी ही स्पिरिटयुक्त विषारी दारू प्यायल्याचं सांगितलं जात आहे. दारू सेवनानंतर नागरिकांना अचानक चक्कर येणे, उलट्या होणे आणि तोंडाला फेस येणे अशी गंभीर लक्षणं दिसून आली. काही जणांचा उपचारादक्यान मृत्यू झाला, तर काहींनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच प्राण सोडले. गेल्या 48 तासांतच 1। जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. फुगेवाडीतील आणखी तिघांच्या मृत्यूमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. पांडुरंग फुगे विजय राठोड, राजेंद्र राठोड, राजेंद्र राजपूत, अकबर पठाण यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर काशिनाय निकाळजे आणि आनंद देसाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते.                                      

 मृतांची नावे

मृतांमध्ये राहुल शरद क्षीरसागर (वय ४७), विजय भूकुरलाल शर्मा (वय ४५), अरुण वामन डाहर (वय ६०, तिघे रा. पांढरेमळा, हडपसर), दत्ता माधवराव सूर्यवंशी (वय ५५, रा. काळे कोलनी, ससाणेनगर, अशोक रमेश चव्हाण (वय ५२, रा. ससाणेनगर, काळेपडळ) आणि प्रवीण आधव (वय ४२, हिंगणे आळी, हडपसर) पांडुरंग सखाराम फुगे (यप ५७) विजय प्रकाश राठोड (वय ३१) राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४) राजेश राजपूत (वय ५१) अकबर अजीमखान पठाण (वय ४८) बाबा सय्यद अली शेख (वय ४४) आनंद निकाळजे आनंद देसाई                                                                                                             

 दोषींवर कठोर कारवाई करणार-पोलिस आयुक्त

  • या  संदर्भात  पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, शहरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गावठी दारू पिल्यामुळे त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खून, दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दारू विक्रीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पडताळणी करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपास युद्ध पातळीवर सुरू असून, दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल     

  एकही आरोपी सुटता कामा नये : मुख्यमंत्री

  •  पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं असून या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या दोन दिवसांत विषारी दारूमुळे तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वा प्रकरणाची गंभीर दखल घेत वेट पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साथला "या प्रकरणात कोणतीही हयगय करू नका एकही आरोपी सुटता कामा नये. कठोर कारवाई करा," असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.                                                                                                


आ. रोहित पवारांनी दारुचे काऊंटर फोडले

  •  ज्या दारु अड्यांमुळे  ही दुर्देवी घटना घडली, तिथे रोहित पवार स्वतः पोहोचले व त्यांनी काऊंटर फोडला. रोहित पवारांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी हा दारु अड्डा फोडून टाकला. तिथे लावलेले पत्रे उखडले. "जेव्हा सिस्टिम काम करत नाही, जेव्हा पोलीस प्रशासन कमी पडते, तेव्हा आम्हाला लोकांना एक संदेश द्यायचा आहे, काही गोष्टी हातात घ्याव्या लागतील. लहान मुलींवर अत्याचार होतो, महिलांवर अत्याचार होतो, मिस्टिम मदत करत नाही, अजितदादांच्या बाबतीत सिस्टिम मदत करत नाही" असं रोहित पवार म्हणाले.                                                                                                    

दोषींवर कठोर कारवाई करा : सुनेत्रा पवार

  • पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकसी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट