‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

खोपोलीत नालेसफाई की हातसफाई ?


नाले अद्याप गाळातच,नागरिकांमध्ये संतापाची लाट

खोपोली - सारिका सावंत :  अतिवृष्टिमुळे दरवर्षी खोपोली शहरातील मुख्य गटारे- नाले तुंडूब भरल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होत असते म्हणूनच दोन महिण्यापासून छोटे - मोठे नाल्याची साफसफाई करायला हवी परंतु पावसाळा तोंडावर आला तरीही नाले सफाईची कामे अर्धवट आहेत कंत्राटदार पूर्ण गाळ न काढता केवळ वरवरची सफाई करीत असल्याने नाल्यांमध्ये टाकले जाणारे प्लॅस्टिक आणि राडारोडामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्यास सखल भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची भिती नागरिक व्यक्त करीत आहेत तसेच मान्सूनपूर्व कामे पूर्ण होण्याच्या डेडलाइन्स हुकवत यंदा नालेसफाईचा फज्जा उडाल्यामुळे नागरिक तिव्र संताप व्यक्त करीत आहेत.
शहरातील भानवज - शास्त्री नगर येथून येणाऱ्या नाल्यामुळे भाऊ कुंभार चाळ, गुलशन अपार्टमेंट,विनानगर परिसर, शिळफाटा येथील डिसी नगर आदि काही भागांमध्ये पावसाचे पाणी सखळ भागात साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते याठिकाणी प्रामुख्याने नाले सफाई केली पाहिजे.विणानगरला लागून क्रांतिनगरचा मोठा नाला आहे याठिकाणी नाले सफाई झालेली नाही तसेच विणानगरधील नाल्यावर गवत,झाडेझुडपे वाढल्यामुळे डांसांचे प्रमाण वाढले आहे.
नाल्याला संरक्षण कठडे नाहीत,ज्या ठिकाणी आहेत ते तुटलेल्या अवस्थेत आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजू सरकार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
यंदा दिखाव्या पुरती नाले सफाई केली आहे का? असा सवाल करीत खोपोलीकर नगरपरिषेदेच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट