कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला महत्त्वपूर्ण गती C&DA करारावर स्वाक्षऱ्या When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला महत्त्वपूर्ण गती C&DA करारावर स्वाक्षऱ्या

  • by
  • Sep 18, 2026

भगीरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्स यांच्यासोबत म्हाडाचा करार; ऐतिहासिक कामाठीपुराच्या नियोजित पुनर्विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण

मुंबई, दि. १७ सप्टेंबर, २०२६ : मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा (दक्षिण मध्य मुंबई)  समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आज महत्त्वपूर्ण गती मिळाली. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत (MBRRB) Construction & Development Agency (C&DA) पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी भगीरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्स यांच्यासोबत आज C&DA करार करण्यात आला. या करारामुळे नियोजनाच्या टप्प्यातील प्रकल्पाने आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे.


            वांद्रे स्थित म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक श्री अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी म्हाडा व मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच मे. भागीरथी हाऊसिंग प्रा. लि. व मे. माथी डेव्हलपर्स प्रा. लि. चे संचालक,  व विकासकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

याप्रसंगी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल यांनी मंडळाच्या अधिकार्यांना तसेच विकासकांना शुभेच्छा दिल्या व ते म्हणाले की C&DA करारामुळे कामाठीपुराच्या पुनर्विकासाने नियोजनाच्या टप्प्यातून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांचे सुरक्षित, सन्मानजनक आणि आधुनिक जीवनमान हे या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असून, कामाठीपुराची ऐतिहासिक ओळख जपत येथे आधुनिक, शाश्वत आणि नागरिककेंद्रित परिसर उभारण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीच्या माध्यमातून हा प्रकल्प पुढे नेला जाईल.

       कामाठीपुरा हा मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीचा अविभाज्य भाग आहे. सुमारे शंभर वर्षे जुन्या इमारती, दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते आणि कालानुरूप अपुऱ्या ठरलेल्या पायाभूत सुविधा यामुळे या परिसराचा सर्वंकष पुनर्विकास करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ स्वतंत्र इमारतींची पुनर्बांधणी न करता संपूर्ण परिसराचा एकात्मिक, नियोजित आणि समूह पद्धतीने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.  

        सुमारे ३४ एकर क्षेत्रात, गल्ली क्रमांक १ ते १५ मध्ये प्रस्तावित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सुमारे ४७५ उपकरप्राप्त आणि २५९ बिगर-उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे. उपलब्ध प्रकल्प आराखड्यानुसार सुमारे ८,००१ निवासी व व्यावसायिक भाडेकरू/रहिवासी, त्यामध्ये सुमारे ६,६२५ निवासी आणि १,३७६ बिगरनिवासी भाडेकरू, तसेच सुमारे ८०० जमीनमालक या प्रकल्पाशी संबंधित आहेत. अधिकृत प्रकल्प माहितीनुसार या भागातील भूखंड आकाराने लहान व अरुंद असल्यामुळे स्वतंत्र इमारतींच्या पुनर्विकासाऐवजी समूह पुनर्विकास हा एकात्मिक नियोजनासाठी योग्य पर्याय ठरतो.

         कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्प DCPR-2034 मधील विनियम 33(9) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी तसेच विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून दर्जा देण्यात आला आहे. जून २०२५ मध्ये म्हाडाने C&DA नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. शासनाने दि. ६ एप्रिल २०२६ रोजी निविदा स्वीकारून संबंधित विकासकांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर दि. ८ एप्रिल २०२६ रोजी अटी व शर्तींच्या अधीन राहून देकारपत्र देण्यात आले होते. तसेंच  पात्रता निश्चिती, क्षेत्र निश्चिती तसेच रहिवासी व जमीनमालकांची संमती यासाठी प्रकल्प व्यवहार्यता समिती स्थापन करण्यात आली आहे.

         या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यमान पात्र रहिवासी व भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन करण्यात येणार असून, पात्र निवासी भाडेकरूंना ५०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिकांची तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक गाळेधारकांच्या पुनर्वसनाचाही प्रकल्पात समावेश आहे. त्याचबरोबर कामाठीपुरा समूह पुनर्विकासातून म्हाडासाठी सुमारे ४४,००० चौ.मी. गृहसाठा उपलब्ध होणार असून, यामधून सुमारे ९०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिकांची निर्मिती प्रस्तावित आहे . 

         प्रस्तावित विकासामध्ये पुनर्वसन इमारतींसोबत निवासी व व्यावसायिक क्षेत्र, सार्वजनिक सुविधा, मनोरंजनासाठी खुल्या जागा, हरित क्षेत्र, अंतर्गत रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि आधुनिक नागरी पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे पुनर्वसनानंतर नागरिकांना केवळ नवीन घरे मिळणार नसून त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक सुविधा नियोजित पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये आधुनिक व भूकंपरोधक बांधकाम तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक वास्तुरचना, पावसाच्या पाण्याचे संधारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, हरित क्षेत्रे, आधुनिक अग्निसुरक्षा व्यवस्था, लिफ्ट सुविधा आणि इतर आवश्यक सामाजिक व नागरी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

         दि. ११ सप्टेंबर, २०२६ रोजी कामाठीपुरा विकास समितीच्या सहकार्याने आयोजित नियोजित आराखड्याचे सादरीकरण व जनसंवाद कार्यक्रमात स्थानिक नागरिक, भाडेकरू, जमीनमालक आणि विविध घटकांच्या प्रतिनिधींना प्रस्तावित प्रकल्पाची माहिती देण्यात आली. प्रकल्पाचे वास्तुविशारद यांनी प्रकल्पाची संकल्पना, व्याप्ती, पुनर्वसनाचे नियोजन, प्रस्तावित सुविधा आणि भविष्यातील विकासाची दिशा यांचे सविस्तर सादरीकरण केले. नागरिकांनी आपल्या सूचना, अपेक्षा आणि प्रश्न मांडले असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक माहिती दिली. या संवादाच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि विश्वास या बाबींना पुनर्विकास प्रक्रियेत विशेष महत्त्व देण्यात आले आहे.  

        पुनर्विकास प्रक्रियेदरम्यान रहिवासी, व्यावसायिक गाळेधारक आणि जमीनमालकांना आवश्यक आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी दि. १३ ऑगस्ट, २०२६ रोजी झालेल्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. रहिवाशांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे तसेच पुढील एक वर्षाचे धनादेश देण्यास मान्यता देण्यात आली असून, स्थलांतर व इतर अनुषंगिक खर्चासाठी एकवेळ ₹२५,००० देण्यासही मान्यता देण्यात आली.

         बिगरनिवासी गाळेधारकांसाठी क्षेत्रफळानुसार वाढीव भाड्याची तरतूद करण्यात आली आहे. २०० चौ.फु.पर्यंत ₹२५,०००, २०० ते ४०० चौ.फु. क्षेत्रासाठी ₹३०,००० आणि ४०० चौ.फु.पेक्षा अधिक क्षेत्रासाठी ₹३५,००० प्रतिमाह भाडे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच जमीनमालकांना पुनर्विकास कालावधीत प्रति प्लॉट ₹२५,००० प्रतिमाह भाडे देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

        आज झालेल्या C&DA करारामुळे या प्रक्रियेला आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची दिशा मिळाली असून, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीच्या माध्यमातून ऐतिहासिक कामाठीपुराच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.


रिपोर्टर

  • Anoop chandrakant chavan
    Anoop chandrakant chavan (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Anoop chandrakant chavan

संबंधित पोस्ट