मैफील फिलिंग्सची (बाळांनो आमचं चुकलं तरी काय?)

काही नात्यात चुकी झाली तर माफी मागावी लागते. पण असे एकचं नाते आहे, ज्यात चुकलो जरी तरी हक्काने आपल्याला माफ करण्याची ताकद आई-बाबा या दोन नात्यांमध्ये असते. आई - बाबा हे नाव जरी एकले तरी प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळी जाणीव करून देते. निस्वार्थ प्रेम ज्या प्रेमाला कधीच ब्रेकअप नावाचा शब्द लागत नाही. कुणासाठी आई-बाबा, तर कुणासाठी मॉम-डॅड, तर कुणासाठी माय-बाप, नात एक पण प्रत्येकाने आपल्या पद्धतीने त्या नात्याची बांधिलकी वेगवेगळी केलेली असते. चला तर मग पाहुयात मैफिल फिलिंग्सची या सदरात भाग चौथा, बाळांनो आमचं चुकलं तरी काय?

गावातून शहराकडे आलो आणि जगण्याची पद्धतचं समजली, खरं तर आपल्याला प्रत्येकाला वाटत की शहरात जाऊन मोठ्या शिकलेल्या मुलांचा आदर्श घ्यावा पण कधी कधी तोच आदर्श आपल्याला देखील घातक ठरू शकतो. असेच एकदा चहाच्या कट्ट्यावर बसलो होतो. तेवढ्यात त्या ठिकाणी एक गृहस्थ आले. त्यांना पाहिल्यानंतर थोड तरी समजले की या यांच्या आयुष्यात काही तरी वेगळं मात्र घडून गेल आहे. मला पाहिल्यानंतर त्यांनी एकच प्रश्न विचारला, की तुझ्या वडिलांनी तुला काय शिकवलं..... 

माझं एकच उत्तर, शिक्षणात जरी कमी शिकवलं, तरी आयुष्याच्या प्रवासाच्या धड्यांमध्ये मात्र पीएचडी पर्यंत पोहचवलं. हे उत्तर जरी त्यांच्या मनासारखं नव्हते तरी मला माझ्या उत्तरावर खात्री होती. आणि तेवढ्यात त्यांचे डोळे भरून आले आणि त्याचं वेळेस ते म्हंटले की बाळा तू खूप  नशीबवान आहेस की आज ज्यांनी तुला हे जग दाखवले त्यांची तू जाणीव ठेवतोयेस, हेच आयुष्यभर कर देव कधी कमी पडू देणार नाही..एवढ बोलून तो गृहस्थ निघून गेला, पण मला देखील चैन पडत नव्हते, त्या गृहस्थाचा चेहरा आणि त्याचा विचारलेला प्रश्न... मी पुन्हा दुसर्‍या दिवशी त्याच वेळेत त्या ठिकाणी गेलो आणि तेच गृहस्थ मला परत दिसले. पण मला आज त्यांच्या चेहर्‍यावरचे दु:ख जाणून घ्यायचे होते. मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो आणि एक साधासा प्रश्न विचारला, की तुम्ही दर वेळेस एवढ शांत शांत का असता मी काही तुमची मदत करू शकतो का? पण त्याच उत्तर नाही आलं ... तेवढ्यात म्हंटले की हा प्रश्न बरोबर विचारलास बाळा फक्त त्या नात्याची जागा मात्र चुकीची आहे. गेल्या दहा वर्षापासून मी माझ्या मुलाची वाट बघतोय. हा समोर असलेला वृद्धाश्रम या ठिकाणी त्याने मला येऊन सोडले. कारण मी त्याच्या एका प्रश्नाच उत्तर देऊ शकलो नाही म्हणून मला तो कायम म्हणायचा, की तुम्ही माझ्यासाठी काय केलयं ?... खर तर हा प्रश्न जरी एका वाक्याचा असला तरी याच उत्तर देणं कोणत्याही वडिलांना कठीणच असणार. आज ज्या आई वडिलांनी तुम्हाला संपूर्ण जग दाखवलं, या आयुष्यात कसं वागायच कसं बोलायच, तुमच्या पहिल्या पाऊलापासून तुम्हाला संस्कार दिले आणि त्याच वडिलांना तुम्ही असा प्रश्न कसा विचारू शकता....  आज माझा मुलगा मोठा डॉक्टर आहे. त्याचं लग्न केल आणि सगळचं बदलले. मुलांचे लहानपणाचे दिवस किती मस्त असतात ना, माझ्या दोघ मुलांना मी समोर  असलेल्या  बागेत फिरायला घेऊन यायचो. संध्याकाळी दोघे भाऊ एकाच प्लेटमध्ये पाणीपुरी खायचे. पण काही वेळेस उच्चशिक्षण देण्याच्या नादात आपणच आपल्या नजरेतून खाली पडलेलो असतो. त्यांना कोण सांगणार की जे मी तुला शिकवतोय त्याचा दुप्पटीचा अनुभव आम्ही लोकांनी आधीच घेतलेला असतो. लग्न झाल्यानंतर दोन महिन्यातच त्यांनी आम्हाला वृद्धाश्रमात टाकले, त्याची आई तर त्या धक्यानेच देवाघरी गेली. जातांना तो मला सांगून गेला की बाबा आम्ही दोघ हॉस्पिटल सांभाळतो तर तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून तुम्ही या वृद्धाश्रमात रहा. ज्या आई वडिलांनी तुम्हाला एवढ शिकवलं. स्वत:च्या आयुष्यात तुम्ही जास्तीत जास्त बिझी कस करता येईल याचे धडे दिले आज त्याच आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही बिझी झालात. तुमच्या लहानपणी आम्ही तुमचं बोट पकडायचो कारण तुम्ही बाजारात हरू नये म्हणून पण आज आमच्या म्हातारपणात आम्हाला तुमची बोट पकडायची वेळ आहे तर तुम्ही आमच्या पासूनच लांब निघाले, खरंतर या गोष्टी बदल्यासारख्या नाहीयेत. आणि एवढ बोलून ते बाबा पुन्हा एकदा त्याच्या वृद्धाश्रमाच्या रस्त्याने जाऊ लागले.

आज डॉक्टर, इंजिनियर असे उच्चशिक्षित मुलांचे आईवडीलच वृद्धाश्रमात जातात. पण गावाकडच्या ग्रामीण भागातल्या मुलांचे आई वडील जात नाही.... आज प्रत्येक मुलगा त्याच स्वत:च अस्तित्व निर्माण करण्यामागे पळतोय पण त्याच अस्तित्वाचे खरे निर्माते त्याचे आई-वडील हेच आहे. शेवटी जातांना मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो, आणि खाली मान घालून त्यांना एकचं म्हणालो, बाबा तुम्ही चुकल्यासारखं केल तरी काय? 

प्रसाद भालचंद्र सोनवणे (अभिनेता / लेखक ) 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट