महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वंदन
भारत देशाच्या संविधानाचे जनक, बोधिसत्व, कायदेपंडित, पत्रकार, अर्थतज्ञ, समाजसुधारक डो बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६५ वा महापरीनिर्वाण दिवस, १४ एप्रिल १८९१ मध्ये जन्माला आलेल्या भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ बाबसाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बालपणातच अनेक स्वप्ने बघितली होती. समस्त भारत देशाचे स्वातंत्र्य आणि दलितांचा उद्धार फक्त एवढेच न्हवे तर बाबासाहेबांना एक असा भारत देश घडवायचा होता जिथे समता, बंधुता आणि एकता या धोरणाचे अवलंबन होईल. आणि यासाठी अगदी शेवट पर्यंत बाबासाहेब आणि त्यांचे अनुयायी झटत राहिले. आज बाबासाहेबांच्य ६५ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त जाणून घेऊया बाबासाहेबांची काही खास गोष्ठी
१ - ज्ञानाचा अथांग सागर असणारे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी एकूण ३२ पदव्या घेतल्या होत्या. ज्यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.
२ - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे : मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).
३ - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा : ‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’. ‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’. .स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’. ‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’.
४ - महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने : महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.
फक्त दलित समाजासाठी नाही तर समस्त भारत देशासाठी झटणाऱ्या महामानवास, महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times