राजस्थानचा रॉयल विजय
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई इंडिअन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा नऊवा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला. मुंबई इंडिअन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थान रॉयल्सकडून खेळाची सुरूवात करायला जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल उतरले. जसप्रित बुमराहने तिसर्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जयस्वालला बाद केले. टीम डेव्हिडने त्याचा झेल टिपला. देवदत्त पडीक्कल झटपट बाद झाला. टायमल मिल्सने रोहित शर्मा कडे झेल देण्यास भाग पाडले. कर्णधार संजू सॅमसनने बटलर सोबत ८२ धावांची भागीदारी रचली. केरॉन पोलार्डने तिलक वर्माकडे झेल देण्यास त्याला भाग पाडले. त्याने एक चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २१ चेंडूंत ३० धावा काढल्या. शिमरॉन हेटमायअरला झटपट धावा जमवण्याचं तंत्र चांगलंच अवगत आहे. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने १४ चेंडूंत ३५ धावा काढल्या. त्याला बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला. त्याच षटकात बुमराहने जोस बटरलरचा त्रिफाळा उध्वस्त केला. बटरलरने ११ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ६८ चेंडूंत १०० धावा काढल्या. दोन्ही जम बसलेले फलंदाज बुमराहने बाद केले आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विन धावबाद झाला. टायमल मिल्सने झटपट रियान पराग आणि नवदीप सैनीला परतीचा रस्ता दाखवला. २०व्या षटकाच्या अखेरीस १९३/८ राजस्थानच्या खात्यावर जमा झाले होते.
मुंबई इंडिअन्सकडून डावाची सुरूवात करायला ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा उतरले. रोहित स्वस्तामध्ये बाद झाला. अनमोलप्रित सिंगला सैनीने पडीक्कलकडे झेल द्यायला पाडले. तिलक वर्माने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. ईशान किशन आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि त्याचं लक्ष विचलीत झालं त्याच संधीचा फायदा ट्रेण्ट बोल्टने घेतला. ईशानने ५ चौकार १ षटकाराच्या सहाय्याने ४३ चेंडूंत ५४ धावा काढल्या. जम बसलेल्या तिलक वर्माचा त्रिफाळा अश्विनने उध्वस्त केला. वर्माने ३ चौकार ५ षटकारांच्या सहाय्याने ३३ चेंडूंत ६१ धावा काढल्या. मुंबईला ३४ चेंडूंत ५९ धावांची गरज होती. टीम डेव्हिड, डॅनिअल सॅम, मुरूगुन अश्विन खेळपट्टीवर येऊन जाण्याची भूमिका निभावली. केरॉन पोलार्डने ३ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने २४ चेंडूंत २२ धावा काढल्या. नवदीप सैनीने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर जोस बटलरकडे त्याला झेल देण्यास भाग पाडले. आणि राजस्थानने हा सामना २३ धावांनी जिंकला. मुंबईला अजून एका पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहित शर्माचा अतिआत्मविश्वास आणि संघाचं तिन्ही क्षेत्रातलं चालढकल असलेलं धोरण पराभवाचं प्रमुख कारण ठरलं.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times