Interior / upgardation of Next-Generation Amrit Bharat Coaches. Sample coach ready
- Apr 06, 2026
- 100 views
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज यंत्रणेचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता भर पावसात डोंगर दऱ्यातून वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करून ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल मुख्य अभियंता, भांडूप परिमंडल श्री. संजय पाटील यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. तसेच, पावसाळ्यात काम करताना योग्य काळजी घेण्यास सांगितले आहे . रायगड जिल्यातील डोंगर दऱ्यातून जाणाऱ्या रोहा, अलिबाग, श्रीवर्धन व इतर भागात पावसाळ्याच्या दिवसात अखंडित वीजपुरवठा करणे हे खूप जिकरीचे काम आहे.वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेला मोठे नुकसान झाले आहे.
रोहा येथील २२ के व्ही माणगाव फीडर मध्ये १ उच्चदाब खांब कोसळला तर २ उच्चदाब खांब वाकून राजिवली गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भर पावसात काम सुरु केले. याठिकाणी दुरुस्तीच्या कामाला जाण्यासाठी अनेक अडथळे येत होते. कार्यकारी अभियंता श्री. प्रदीप दाळु यांनी बाधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तात्काळ कारवाई केली व अशा या अवघड परिस्थितीत रोहा विभागातील कर्मचाऱ्यांनी काम करून ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे .अलिबाग येथे ६३ केव्ही डीटीसी मध्ये बिगाड झाल्यामुळे वडखळ व कुरळ येथील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तर, १०० केव्ही डीटीसी मध्ये बिगाड झाल्यामुळे आरती नगर, धामनी, न्यू आर पी नगर, वडखळ व जिते गाव मिळून एकूण १० रोहित्र बिगाड झाले होते व ३० विद्युत खांब वाकले किंवा पडले होते. कार्यकारी अभियंता शैलेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली २४ तासाच्या आत ५ रोहीत्रांची उभारणी केली आहे व इतर ५ रोहित्र उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याशिवाय, महावितरणच्या गोरेगाव विभागातील २२ के व्ही लोणेरे, पाचाड, जांभूळ, खामगाव, बोर्ली व खापोली मिळून ६६ गावात एकूण ११२ डीटीसी पावसामुळे खराब झालेले, कार्यकारी अभियंता श्री. रामकृष्ण पाटील यांनी व त्यांच्या चमूनी मेहनत करून २४ तासाच्या आत वीजपुरवठा सुरळीत केला.
भांडूप परिमंडळाने भर पावसात अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये काम करून यशस्वीरीत्या सर्व यंत्रणा पूर्व पदावर आणली याबाबत भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. संजय पाटील यांनी सर्वांनी केलेल्या समर्पित प्रयत्नांचे कौतुक केले आहे. पावसाळ्यात अनपेक्षित परिस्थिती उद्भवू शकते जेणेकरून वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, म्हणून ग्राहकांनी अशा वेळेस महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times