डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु पुण्यात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल? नारळाच्या झाडांवरून नवा वाद Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

नैना प्रकल्पातील नगररचना परियोजना क्र. ८ ते १२ - लवाद सुनावणीस ३० जून पर्यन्त मुदतवाढ

सहभागासाठी सिडकोचे जमीनधारकांना आवाहन

 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची शासनामार्फत १० जानेवारी २०१३ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियोजन प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे नैना क्षेत्रातील नगररचना परियोजनांची अंमलबजावणी.

सदर नैना क्षेत्रात सद्यस्थितीत एकूण १२ नगररचना परियोजना राबविण्यात येत असूनयातील परियोजना क्र. ८१०११ आणि १२ या योजनांसाठी लवादांची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. काही जमीनधारक विविध कारणांमुळे याआधीच्या सुनावणीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांना संधी मिळावी म्हणून सिडकोने यापूर्वी ३० मे २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली होती.

लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंतीनुसार व हितधारकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सिडको आता ही सुनावणी अंतिमतः ३० जून २०२५ पर्यंत वाढवत आहे. ही अंतिम मुदत आहे. म्हणूनच सिडको सर्व संबंधित भूधारकनागरिक आणि हितधारकांना आवाहन करत आहे कीत्यांनी या संधीचा लाभ घेत आपले म्हणणे मांडण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावेजेणेकरून या महत्वपूर्ण प्रकल्पात त्यांचा सक्रिय सहभाग आणि हितसंपादन होऊ शकेल.

सुनावणीसाठी कृपया आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत - सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यान - सिडको नैना कार्यालयटॉवर क्रमांक १०७ वा मजलारेल्वे स्थानक संकुलसीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे संपर्क साधावा.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट