डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु पुण्यात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल? नारळाच्या झाडांवरून नवा वाद Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्याचा गौरव

मुंबई, दि. १६: “एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी आपल्या कर्तुत्वाने मोठा होऊ शकतो, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि लोकशाहीने सामान्यांना दिलेली मोठी देणगी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख केला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी पूर्ण होत असून, त्यानिमित्त आयोजित निरोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विविध विभागाचे मंत्री यांच्यासह गटनेते व सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, योगशास्त्रात एम. ए., पत्रकारितेचा अनुभव आणि मराठवाडा विभागात बारावीमध्ये गुणवत्ता यादीत सहावे स्थान मिळवणाऱ्या युवकाने जनतेच्या प्रश्नांची समज, ठाम भूमिका, विविध संस्थांबरोबर सामाजिक, क्रीडा आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य, यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आंदोलने उभारून ती यशस्वी केली.

यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आदींनी विरोधी पक्षनेते दानवे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

अंबादास दानवे हे विधानपरिषदेत चर्चेची उंची वाढवणारे विरोधी पक्षनेते – उपमुख्यमंत्री अजित पवार

अंबादास दानवे हे विधानपरिषदेतील चर्चेची उंची वाढवणारे आणि संयमी, परखड भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळऑगस्ट २०२५ मध्ये संपत असल्याने विधानपरिषदेत त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी अंबादास दानवे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले की, “अंबादास दानवे हे परखडपणे प्रश्न मांडणारे, अभ्यासू आणि सभागृहाच्या डेकोरमचे भान राखणारे नेते होते. त्यांनी कायम सामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले.”

विरोधी पक्षनेते दानवे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत भावुक शब्दांत आपल्या कार्यकाळाचा आढावा घेतला. “ही संधी मला जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी मिळाली, याचे समाधान आहे,” असे त्यांनी सांगितले.

हा निरोप समारंभ जरी औपचारिक असला, तरी त्यात एकात्मता, सन्मान आणि सदिच्छा यांचा भाव पुरेपूर दिसून आला.

यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्यासह सदस्य सर्वश्री उद्धव ठाकरे, प्रवीण दरेकर, ॲड. अनिल परब, सतेज पाटील, शशिकांत शिंदे यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.


अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विरोधी पक्षनेते दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट अखेरीस संपणार असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवे यांच्या यांच्या राजकीय कार्याचे आणि संघर्षमय वाटचालीचे कौतुक केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अंबादास दानवे हे मराठवाड्याचे अस्सल प्रतिनिधी असून, जनतेच्या वेदना ज्या तडफेने त्यांनी मांडल्या, ती उदाहरणार्थ ठरेल. त्यांनी विरोधी पक्षनेतेपद केवळ निभावले नाही, तर त्या भूमिकेला जिवंत ठेवले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट