कमी खर्चात प्रभावी उपचार : नवी मुंबई, ऐरोली येथे सहयोग होमिओपॅथिक हॉस्पिटलचे उद्घाटन.
असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (ए. आर. एच.) या होमिओपॅथी क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित संस्थेने आपल्या ऐरोली येथील सेंटरमध्ये "सहयोग होमिओपॅथिक हॉस्पिटल” चे उद्घाटन गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर केले.
या हॉस्पिटलचे उद्घाटन एक्सेल इंडस्ट्रीचे चेअरमन माननीय श्री. अश्विनभाई श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला जेष्ट स्त्रीरोगतज्ञ व संशोधक डॉ. रमा अशोक वैद्य आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रमेश भोंडे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आमचे अनेक पेशंटस् उपस्थित होते.
आंतररूग्ण (I. P. D.) विभाग प्रमुख डॉ. शितल देवरकर म्हणाल्या, आमच्या या नवीन रुग्णालयात होमिओपॅथिक औषोधोपचारांबरोबर तातडीने गरज असलेल्या सुविधा म्हणजेच ऑक्सिजनची व्यवस्था, सलाईन तसेच इ. सी. जी. काढण्याची सोय ठेवण्यात आली आहे. या सर्व सुविधांमुळे जुनाट आजारांप्रमाणेच Acute म्हणजेच जलदपणे उद्भवणारे आजार उदा. ताप, जुलाब, उलट्या इ. सारख्या आजारांमध्येही होमिओपॅथी प्रभावीरित्या काम करते हे सिद्ध करणे सोपे जाईल.
हॉस्पिटलचे उपअधिक्षक डॉ. संदिप पडवळे यांनी या हॉस्पिटलमध्ये कुठल्या प्रकारचे रुग्ण दाखल केले जातील याबद्दल महिती दिली. ते म्हणाले, आम्ही दररोजच्या प्रॅक्टिसेमध्ये जुलाब, उलट्या, ताप यासारखे रुग्ण नेहमीच बरे करत असतो. परंतु काही वेळेला रुग्णांना या आजारांमध्ये, विशेषत: लहान मुले व प्रौढांना, शरीरातील पाणी कमी होऊन गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. अशा रुग्णांना वेळेवर सलाईन देऊन पाण्याची कमतरता भरून काढता येते. अशा रुग्णांसाठी या हॉस्पिटलचा फायदा होऊ शकतो.
त्याचप्रमाणे याप्रकारच्या रुग्णांबरोबरच गरज भासल्यास डेंग्यू, चिकनगुनिया, कोविडसारख्या साथीच्या आजारांचेही रुग्ण या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात येतील. तसेच काही कर्करोगाच्या रुग्णांना त्यांच्या वयोमानापरत्वे केमोथेरपी किंवा ऑपरेशन करता येत नाही अशा रुग्णांनाही त्यांच्या वेदना व त्रास कमी करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठीही उपचार या हॉस्पिटलमध्ये करण्यात येतील.
सहयोग हॉस्पिटलच्या अधीक्षका आणि ए. आर. एच. च्या अध्यक्षा डॉ. वृषाली देशमुख म्हणाल्या ए. आर. एच. च्या ४० वर्षाच्या कारकिर्दीतील हा महत्वाचा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ए. आर. एच. चे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे गुरू दिवंगत डॉ. आपटे यांनी होमिओपॅथीमध्ये संशोधनावर भर देऊन, ही प्रभावशाली आणि किफायतशीर औषोधोपचारापद्धती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी ए. आर. एच. या संस्थेची स्थापना आपल्या सहकाऱ्यांसोबत १९८६ साली मुलुंड येथे केली. आज या संस्थेमध्ये दररोज २००-२५० रुग्ण होमिओपॅथिक औषधांचा किफायतशीर दरात फायदा घेत आहेत.
रुण्यसेवेबरोबरच संस्थेमध्ये डेंग्यूसारख्या आजारावर होमिओपॅथिक औषधांची परिणामकारकता शोधण्यासाठी डॉ. स्वप्निल पाटणे यांच्या टीमचे संशोधन सुरु आहे. त्याचबरोबर विविध जुनाट आजार उदा. संधीवात, आमवात, मायग्रेन, पोटाचे आजार, कॅन्सर इत्यादी अनेक रोगांवर येथे उपचार केले जातात. नव्यानेच डोकेदुखी व स्त्रियांच्या मेनोपॉजवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केले आहेत. तसेच विविध आजाराबाबत जनजागृती कार्यक्रमही राबवले जातात.
लेखक : डॉ. स्वप्निल अशोक पाटणे, सहयोग हॉस्पिटलचे उपअधिक्षक आणि ए. आर. एच. चे औषधोपचार व संशोधन विभाग प्रमुख आहेत.
संपर्क : 9987413301/9987414440/9987418474
ई-मेल: office@arhcm.org
वेब-साईट: www.arhcm.orgww.arhcm.org
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
Krutika Tushar KhanvilkarDedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.