‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

"मेट्रो कामामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी"

मेट्रो कामाचे गर्डर बसविण्यास उशीर झाल्याने घोडबंदर मार्गावर वाहतुक कोंडी ठाणे: घोडबंदर मार्गावर रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत तुळई (गर्डर) बसविण्याची मुदत होती. परंतु हे काम सकाळी ८ वाजेच्या सुमारास पूर्ण झाले. या कालावधीत घोडबंदर मार्गावर वाहतुकीचा भार वाढल्याने घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा, कासारवडवली, वाघबीळ, पातलीपाडा, ब्रम्हांड सिग्नल, ब्रम्हांड अंतर्गत मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली. त्यामुळे कामानिमित्ताने ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. तसेच ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरही वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे घोडबंदरच्या प्रवासातही प्रवाशांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. घोडबंदर येथील मानपाडा भागात मेट्रो मार्गिकेचे स्थानक उभारले जात आहे. या मेट्रो स्थानकापासून काही मीटर अंतरावर मुल्ला बाग परिसरात पादचारी पूल उभारला जात असून त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरु होते. रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत या कामास परवानगी होती. परंतु तुळई उभारण्यास सुमारे सकाळी ८ वाजले. या कालावधीत येथील मानपाडा भागात होणारी वाहतुक बंद करावी लागली होती. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला.घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर भाईंदरपाडा ते ब्रम्हांड सिग्नल पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. वाहनांना ब्रम्हांड सिग्नल येथून अंतर्गत मार्गावर प्रवास करण्यास मुभा असल्याने येथील अंतर्गत मार्गावरही कोंडी झाली होती. तर ठाण्याहून घोडंबदरच्या दिशेने बाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरही आर मॉलपर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. तुळई बसविल्यानंतर मानपाडा भागातील वाहतुक सोडण्यात आली. परंतु वाहतुक कोंडी पूर्णतः सुटली नव्हती.

रिपोर्टर

  • Sanket Jadhav
    Sanket Jadhav (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Sanket Jadhav

संबंधित पोस्ट