"तिसरी मुंबई : स्वप्नांचे गगन, वास्तवाचा अंधार"
- by
- May 14, 2026
तिसऱ्या महामुंबईचा बागुल बुवा......आगरी कोळी, सातपगड जातीना उध्वस्त करणार ही भीती.
पेण (दीपक लोके) : तिसरी महामुंबई हा केवळ विकासाचा आराखडा नसून तो स्थानिकांच्या मनात भीती,असुरक्षितता,आणि त्यांच्या अस्तित्वाच्या ,प्रश्नांची धग निर्माण करणारा विषय बनला आहे. विशेषत आगरी कोळी,इतर सातपगड जाती,आणि इतर पारंपरिक जमिनी,समुद्राशी असणारे नाते.असा विस्तृत समाज एकाच प्रश्न विचारत आहे.हा विकास आमच्यासाठी आहे का आमच्या विरोधात आहे? आज तिसऱ्या मुंबईचे गोड स्वप्नं दाखविले जात आहे येथे उंच गगनचुंबी इमारती,विस्तीर्ण रस्ते, आय टी पार्क,उद्योग जागतिक दर्जाचे शहर अशी भाषा केली जाते.मात्र तथा कथित आराखड्यात हजारो कुटुंबाचे विस्थापन ,पारंपरिक संस्कृतीचा ऱ्हास ,स्थानिक भूमिपुत्र आर्थिक गुलामगिरीकडे ढकलले जाण्याची भीती निर्माण होत आहे. आगरी समाजाने पिढ्यानपिढ्या खाऱ्या जमिनीत घाम गाळून शेती उभी केली आहे. कोळी बांधवाने समुद्राशी नाळ जोडून जीवन घडविले आहे.बहुजन समाजाने,सातपगड जातीने आपली संस्कृती,परंपरा,रूढी,चालीरीती उत्तम जपल्या आहेत आणि संपूर्ण परिसर जिवंत ठेवला आहे.
आज त्याच जमिनीवर विकास नावाचा बुलडोझर फिरविण्याचा तयारीत सरकार,प्राधिकरण तयारी करत आहे. सरकार आणि प्राधिकरण सांगत आहे की कोणावर अन्याय होणार नाही.पण ताजा इतिहास असा असा आहे,नवी मुंबई, जेएनपीटी, MIDC, सेझ, नैना,प्रकल्पाने वेगळीच स्वप्न दाखवून,पूर्ण समाज देशोधडीला लागला आहे,रोजगारापासून वंचित,पुनर्वसन आणि सन्मानासाठी भटकत आहे आमचा भूमिपुत्र.त्यामुळे तिसऱ्या मुंबईची भीती भीतीच ठरणार आहे हे नक्कीच. खरा प्रश्नजमिनीचा नाही तर ओळखीचा आहे.जर या मायभूमी वर बुलडोझर फिरला तर संकृती लोप पावणार.जर मच्छिमार समुद्रापासून दूर गेले तर त्याची संस्कृती,उपजिविकेचे साधन कोणते असेल.?आज स्थानिकांना वाटते की आमच्या परिसरात आम्हालाच परके करण्याचा डाव आहे.जमीन विक्रीचा व्यवहार करणारे,विकत घेणारे जमिनीची किंमत ठरविणारे बाहेरचे,त्यामुळे पांढरे हत्ती आत्ता दिसत सुटलेत.ते भूमिपुत्रांना धनादेश दाखवून मधाचे बोट लाऊन,अंधारात ठेवून . हे स्वार्थी दलाल लोकांना फसवू पाहत आहेत,याला बळी पडता कामानये हेच खरे आहे. पैसा येईल जाईल पण जमीन मात्र कायमची जाईल...ही भीती केवळ भावनिक नाही तर सामाजिक वास्तव आहे. कारण जमीन गेल्यानंतर पुढची पिढी भूमिहीन होईल,शिक्षणासाठी. पैसा पुरणार नाही,घरातील लागणारे धान्य पूर्वीसारखे नसणार, त्यांचे आर्थिक जीवन अस्थिर राहणार,गावागावातील नातेसमंध दुरावणार,संकृती,देवळे,क्रीडांगणे, संपणार.मग हा विकास मोजक्या लोकांच्या हातात स्थिरावेल.
म्हणूनच आज गरज आहे ती आंधळ्या विरोधाची नाही तर जागृत प्रश्न विचारण्याची......
१) स्थानिकांना प्रकल्पात किती हिस्सा ?
२) भूमिपुत्रांना कायम रोजगाराची लेखी हमी.?
३) पुनर्वसन गावची संस्कृती जपणारी असेल काय?
४) शेतकरी,आगरी,कोळी,बहुजन समाज निर्णय प्रक्रियेत असेल काय?
५) प्राधिकरण कमीतकमी चार पिढ्यांची सोय करेल काय?
प्रश्न विचारणे म्हणजे विरोध नाही तर न्यायाची मागणी आहे. खरोखरंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे ड्रिम प्रोजेक्ट सत्यात उतरायचे असेल तर प्रत्येकाला लेखी स्वरूपात हमी दिली पाहिजे नाहीतर हा विकास परिसराला देशोधडीला लावेल ही भीती सामान्य माणसाला वाटते.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times