अंधेरी परिसरात पदपथांवरील ९ अनधिकृत दुकाने निष्कासित
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाकडून कारवाई
अंधेरी परिसरात पदपथांवर दुकाने, शेड उभारुन पादचाऱ्यांच्या मार्गक्रमणात अडथळा निर्माण करणाऱ्या ९ अनधिकृत दुकानांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाकडून काल (दिनांक १८ जून २०२६) निष्कासन करण्यात आले.
उपायुक्त (परिमंडळ ४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या अंतर्गत, अंधेरी येथील फन रिपब्लिक मार्गावरील एका दुकानाचे निष्कासन करण्यात आले. तर, एका अनधिकृत दुकानावर जप्तीची कारवाई करण्यात आली.
वीरा देसाई मार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत ८ अनधिकृत दुकानांचे निष्कासन करण्यात आले. तसेच, अनधिकृतपणे उभारलेले शेड आणि पायऱ्या तोडण्यात आल्या. या कारवाईमुळे, परिसरातील पदपथ मोकळा झाला असून पादचाऱ्यांना मार्गक्रमण करणे सोयीचे झाले आहे.
‘के पश्चिम’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत परिरक्षण, इमारत व कारखाना, अनुज्ञापन आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी विविध संयंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली. आंबोली पोलीस ठाण्याकडून यावेळी पुरेसा बंदोबस्त तैनात होता.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times