विद्यार्थ्यांची हक्काची वाट रोखली
कौलोशी आदिवासीवाडीतील चिमुरड्यांना शाळेत जाण्यासाठी साधा रस्ताही नाहीविकासकाने घातले कंपाऊंड
मनसे आक्रमक
पाली (निशांत पवार) :- स्वातंत्र्याची अनेक वर्षे उलटूनही ग्रामीण आणि दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. सुधागड तालुक्यातील कौलोशी आदिवासीवाडीतील येथील लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नसल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाच येथील मुलांची पाऊलवाटही बंद होण्याच्या मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुधागड तालुका मनसे अध्यक्ष सुनील साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौलोशी आदिवासीवाडीतील येथील लहान मुले दररोज शिक्षणासाठी शाळेत जातात. मात्र, त्यांच्या हक्काचा रस्ता अद्याप तयार झालेला नाही. त्यातच एका स्थानिक विकासकाने आपल्या जागेभोवती मोठे सिमेंटचे कंपाऊंड (भिंत) घातले आहे. या कंपाऊंडमुळे मुलांची मुख्य वाट अडवली गेली असून, सध्यातरी मुले एका छोट्या पायवाटेने प्रवास करत आहेत. परंतु, पावसाळा सुरू झाल्यावर ही पर्यायी पायवाटही पूर्णपणे चिखलमय होऊन कायमची बंद होणार आहे. यामुळे या लहान मुलींनी आणि विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात नक्की कोणत्या वाटेने शाळेत जावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येवर स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
एका बाजूला शिक्षणाचा हक्क सांगायचा आणि दुसऱ्या बाजूला चिमुरड्यांना रस्त्यासाठी वणवण करायला लावायची, हा प्रशासनाचा ढिसाळपणा आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या एसी खुर्च्या सोडून जरा तालुक्यात फिरावे आणि जनतेचे प्रश्न पाहावेत. आम्ही ही परिस्थिती अजिबात सहन करणार नाही. आम्ही स्वतः जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहोत आणि त्या मुजोर विकासकाला मनसे स्टाईलने दणका देणार. आमच्या आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा आणि रस्त्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे.
--सुनील साठे, अध्यक्ष, मनसे सुधागड तालुका
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times