ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे सत्र सुरुच चिमुकलीसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत


अमरावती : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताने पाच जणांचा बळी घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूरहून मुंबईकडे निघालेली बॅगनआर कार भरधाव ट्रकच्या मागे आदळल्याने हा भीषण अपघात झाला. घड़केची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा अक्षरशः चुराडा इाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन बचाव पडकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघात धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चैनल क्रमांक १०५ जवळ घडल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन

समृद्धीमहामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमालीचा वाचत असल्याने नागरिक या मार्गाचा सर्रास वापर करतात. मात्र, या सरळ आणि मोकळ्या महामागाँवर चाहनांचा वेग अनियंत्रित झाल्याने आतापर्यंत अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मृतांची नावे

आरती जीवने (४०), भास्कर जीवने (५७), महादेव जीवने (४२), लता जीवने (४३) आणि प्रिशा जीवने (१२) (सर्व रा. डी.एड. कॉलेजजवळ, बाबुपेठ, चंद्रपूर)

समृद्धी महामार्गावरून (प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि नातेवाईकांवर शोकाकळा पसरली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसताच वॅगनर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची किंवा सावरण्याची साधी संधीही मिळाली नाही. या दुर्घटनेत कारमध्ये सवार असलेल्या पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान चिमुकलीचा समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि महामार्ग सुरक्षा यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना वाचवून रुग्णालयात दाखल करण्यासाठी तारकाळ मदतकार्य सुरू करण्यात आले. परंतु, धडक इतकी भीषण होती की मदत मिळेपर्यंत पावही जणांची प्राण ज्योत मालवली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जवळच्या सासकीय रुग्णालयात पाठवले असून, पुढील तपास सुरू केला आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट