डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु पुण्यात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल? नारळाच्या झाडांवरून नवा वाद Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

वीजबिल थकबाकी 116 कोटींवर

40 टक्के वीज ग्राहकांनी बिल भरण्याकडे पाठ

पनवेल ः पनवेल आणि उरण तालुक्यात करोनाच्या कालावधीत वीज ग्राहकांनी बिले न भरल्यामुळे थकबाकीचा आकडा तब्बल 116 कोटी रुपयांवर गेला आहे. ही थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान पनवेल शहर विभागीय कार्यालयापुढे उभे राहिले आहे. 

महावितरणच्या पनवेल शहर विभागीय कार्यालयांतर्गत कळंबोली, खारघर, पनवेल शहर, पनवेल 1 आणि उरण असे पाच उपविभाग येतात. पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात महावितरणचे लाखो ग्राहक आहेत. करोनाच्या काळात महावितरणने सक्तीची वसुलीदेखील बंद केली. त्यामुळे महावितरणच्या थकबाकीचा आकडा वाढत गेला. रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे, शासकीय कार्यालये आणि शेतीपंप आदींना महावितरण वीजपुरवठा करते. करोनानंतर नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची सवलत देऊनही नागरिकांनी वीज बिले न भरल्यामुळे ही थकबाकी वाढत गेली आणि पनवेल शहर विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या पाच उपविभागांत थकबाकीचा आकडा 116 कोटी 72 लाख रुपयांवर गेला आहे. ही आकडेवारी पाहता 40 टक्के वीज ग्राहकांनी बिल भरण्याकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.

पनवेल शहर विभागीय कार्यालयात लॉकडाउनपूर्वी दरमहा उपविभागीय कार्यालयांमधून वीजबिलापोटी 70 ते 80 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असताना सरासरी 15 ते 20 कोटी रुपयांची तफावत राहात होती. करोनानंतर ही परिस्थिती बदलली असून पाच कार्यालयांमधून दररोज फक्त दीड ते दोन कोटी रुपये वसूल होत होते. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिल्यानंतर बुधवारी पहिल्याच दिवशी 6 कोटींची वसुली झाली होती.

ग्रामीण भागात सर्वांधिक थकबाकी
पनवेल तालुक्यातील शहरी भागातील उपविभागीय कार्यालयांपेक्षा पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागांतील वीजग्राहकांचे बिल न भरण्याचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागांत तब्बल 38 कोटी 3 लाख रूपयांची थकबाकी वसूल करण्याची डोकेदुखी पनवेल तालुक्याचा ग्रामीण भाग असलेल्या पनवेल 1 कार्यालयापुढे आहे. भविष्यात वीजपुरवठा सुरळीत राहाण्यासाठी नागरिकांनी बिले भरून महावितरणला सहकार्य करावे, अन्यथा नाईलाजास्तव कारवाई करावी लागेल,’ असे महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट