सुदर्शन'च्या सहाय्याने ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी*
- युनिफॉर्म स्टिचिंग सेंटरचे उद्घाटन; प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
रोहा, प्रतिनिधी: सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्याचा एक उल्लेखनीय प्रकल्प हाती घेतला आहे. सुदर्शन सीएसआर फाऊंडेशनने रोहा धाटाव-बारसोली (सुंदरनगर) येथे युनिफॉर्म स्टिचिंग सेंटर विकसित करून ग्रामीण भागातील गरजू महिलांना रोजगाराची नवीन संधी निर्माण केली आहे. या स्टिचिंग सेंटरच्या माध्यमातून रोहा विभागातील होतकरू महिलांना प्रशिक्षित करून त्यांना आर्थिकवृद्धी देण्यासाठी सुदर्शनकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
या प्रकल्पाच्या पहिल्याच टप्प्यात कंपनीतील कर्मचारी वर्गाच्या 1500 युनिफॉर्म्सची ऑर्डर कंपनीनेच दिल्याने महिलांना प्रोत्साहन व नवा आत्मविश्वास मिळाला आहे.
सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या विशेष मार्गदर्शनखाली महिलांमध्ये कौशल्य विकासित करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे या उद्देशातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याअनुषंगाने युनिफॉर्म स्टिचिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना आता शासकीय, खाजगी संस्था आणि औद्योगिक विभागातील युनिफॉर्म्सची मागणी पूर्ण करता येईल.
युनिफाॅर्म स्टिचींग सेंटरचे उद्घाटन सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड रोहाचे साईट हेड विवेक गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.
"सुदर्शन व्यवस्थापन आपल्या विविध सीएसआर उपक्रमांतून रोहा विभागात सामाजिक विकास करणेसाठी कायमच कटीबद्ध राहिलेली आहे. तसेच या प्रकल्पामध्ये महिलांनी दाखवलेला सहभाग आणि समर्पण प्रेरणादायी आहे," असे मत विवेक गर्ग यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी सहभागी महिलांना दर्जात्मक कामासाठी मार्गदर्शनही केले.
सुदर्शनचे अधिकारी शिवदास बनकर म्हणाले की, हा प्रकल्प केवळ रोजगार निर्मितीपुरता मर्यादित नसून, ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे साधन बनला आहे. स्थानिक पातळीवर उद्योजकता वाढविणे आणि रोजगार निर्मितीसाठी सुदर्शन सीएसआर फाऊंडेशन असे अभिनव उपक्रम राबवित आहे.
यावेळी सुदर्शनने उपलब्ध करून दिलेल्या या उपक्रमासाठी उपस्थित महिलांनी सुदर्शन व्यवस्थापन, सीएसआर फौंडेशनचे विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे आम्ही हा उपक्रम यशस्वी करून दाखवूच असा विश्वास कंपनी व्यवस्थापनास दिला. तसेच या रोजगारातून आम्हाला आता कुटुंबास आर्थिक हातभार देता येईल याचे आम्हाला खुप समाधान होत आहे, असे मत उपस्थित महिलांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी गणेश बांभुरकर, संतोष मोढवे, ॲड. विशाल घोरपडे, पराग फुकणे, श्याम धुसाने, रवि दिघे, महेश डेरीया, स्वाती मोहिते, समीर वाडवळ व अमर चांदणे आदी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times