मा. महापौर व मा. आयुक्त यांची मेट्रो उड्डाणपुलाखाली विकसित होत असलेल्या उद्यान व भाईंदर (पश्चिम) येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कामांची पाहणी
मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता व मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांनी शहरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यामध्ये मेट्रो उड्डाणपुलाखाली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, पाळीव प्राणी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी विकसित करण्यात येत असलेल्या उद्यानाच्या कामाची तसेच भाईंदर (पूर्व) येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाची सविस्तर पाहणी करण्यात आली. यावेळी मा. स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गहलोत, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, सन्माननीय नगरसेवक/नगरसेविका, संबंधित अधिकारी, कंत्राटदार व कर्मचारी उपस्थित होते. मेट्रो उड्डाणपुलाखालील उपलब्ध मोकळ्या जागेचा नागरिकांच्या हितासाठी प्रभावी वापर व्हावा या उद्देशाने महानगरपालिकेमार्फत आधुनिक उद्यान, हिरवळ विकास, पादचारी पायवाटा, ओपन जिम, बसण्याची व्यवस्था तसेच विविध मनोरंजनात्मक सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना विरंगुळा, व्यायाम, आरोग्यवर्धन तसेच सामाजिक संवादासाठी एक दर्जेदार सार्वजनिक जागा उपलब्ध होणार आहे. पाहणीदरम्यान मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता यांनी उद्यानातील पायवाटा, हिरवळ विकास, वृक्षारोपण, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, नागरिकांसाठी बसण्याची सुविधा तसेच ओपन जिममधील व्यायाम साहित्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि त्याच्या स्थापनेची पद्धत यांचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांना सुरक्षित, आकर्षक व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कामांमध्ये कोणतीही तडजोड न करता नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना दिल्या. याचबरोबर भाईंदर (पूर्व) येथे उभारण्यात येत असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी विकसित करण्यात येणारे बास्केटबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, पिकलबॉल कोर्ट तसेच जलतरण तलाव (स्विमिंग पूल) यांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. शहरातील क्रीडाप्रेमी नागरिक, युवक व विद्यार्थ्यांना आधुनिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या पाहणीदरम्यान मा. महापौर यांनी सर्व क्रीडा सुविधांची गुणवत्ता, सुरक्षितता, देखभाल व्यवस्था तसेच नागरिकांना सहज वापरता येतील अशा सुविधा निर्माण करण्याबाबत आवश्यक निर्देश दिले. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच युवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रकल्पातील सर्व कामे उच्च दर्जाची व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांनी देखील संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना सर्व कामांवर नियमित देखरेख ठेवण्याचे, गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे तसेच नागरिकांना लवकरात लवकर या सुविधांचा लाभ मिळेल यासाठी आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश दिले. मिरा-भाईंदर महानगरपालिका शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा, सार्वजनिक विरंगुळ्याची ठिकाणे तसेच आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामे गतिमान करण्यात येत आहेत.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times