हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे सकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला.
भरधाव डंपरची जोरदार धडक; दुचाकीवरील महिला अक्षरशः हवेत फेकली गेली अन्....
हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशीमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना
हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे सकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. एका भरधाव येणाऱ्या डंपरने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडून जाकादेवी येथील पांचाळ कुटुंबातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटलेला डंपर महामार्गावरून थेट खाली कोसळला आणि याच डंपरखाली दाबले गेल्याने महिलेला आपले प्राण गमवावे लागले.
धडक बसताच दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली अन्
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जाकादेवी येथील पांचाळ कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत असताना, खेडशी परिसरामध्ये पाठीमागून येणाऱ्या एका अनियंत्रित आणि वेगवान डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक बसताच दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली आणि डंपरच्या थेट खाली आली. दुचाकीला उडवल्यानंतर डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले त्यामुळे , डंपर रस्त्याच्या खाली कोसळत असताना ती महिलाही डंपरच्या खालीच दबली गेली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
एकाच ठिकाणी 2 अपघात, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा,
विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे, आज सकाळी ज्या ठिकाणी हा डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला, त्याच ठिकाणी काही वेळापूर्वीच एका रिक्षाचाही अपघात झाला होता. त्यामुळे हा परिसर आज सकाळी अपघाताचे केंद्र बनला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, डंपर महामार्गावरून खाली कोसळल्याने आणि मोठी गर्दी जमल्याने हातखंबा-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, या घटनेमुळे संपूर्ण जाकादेवी आणि खेडशी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
नितेश नारायण राणे
- जन्मदिन
- June 23
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times