*असंसर्गजन्य आजारांविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभावी मोहीम*
आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), हृदयविकार (Cardiovascular Diseases) तसेच विविध प्रकारचे कर्करोग (Cancer) यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग तपासणी व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ३० वर्षांवरील स्त्री-पुरुषांची नियमित तपासणी करण्यात येत असून, संबंधित माहिती शासनाच्या ‘NCD डिजिटल पोर्टल’वर नोंदविण्यात येत आहे.
या कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग यांची तपासणी व चाचण्या करण्यात येत आहे. तसेच संशयित रुग्णांना पुढील उपचारांसाठी सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ येथील ऑन्कोलॉजी विभागात संदर्भित करण्यात येते.
याविषयी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेमार्फत सातत्याने आढावा घेतला जात असून त्यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग तपासणी व नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध प्रकारची कार्यवाही करण्यात येत आहे.
यामध्ये –
• 30 वर्षांवरील नागरिकांची घरभेटीद्वारे तसेच आरोग्य केंद्रांवर नोंदणी करण्यात येत आहे.
• या तपासणी दरम्यान एखाद्या व्यक्तीस उच्च रक्तदाब किंवा त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळल्यास तात्काळ उपचार सुरू करण्यात येतात.
• महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा व स्तनाचा कर्करोग तसेच पुरुषांमध्ये मुख कर्करोगाची प्राथमिक तपासणी केली जाते.
• ‘NCD पोर्टल’वर नोंदणी झालेल्या सर्व रुग्णांना मोफत औषधोपचार व नियमित पाठपुरावा सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तसेच डिजिटल हेल्थ आयडी (ABHA) लिंक करण्यात येतो.
*आशा स्वयंसेविकांची महत्त्वपूर्ण भूमिका*
आशा स्वयंसेविका आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांशी थेट संपर्क साधून विविध महत्त्वाची कामे करीत आहेत. यामध्ये त्यांच्यामार्फत -
• 30 वर्षांवरील प्रत्येक नागरिकासाठी ‘कम्युनिटी बेस्ड असेसमेंट चेकलिस्ट’ (CBAC) फॉर्म भरला जातो.
• उपचार सुरू असलेल्या रुग्णांनी वेळेवर औषधे घेतली की नाही यासाठी नियमित गृहभेटी दिल्या जातात.
• संशयित नागरिकांची एएनएम मार्फत डिजिटल बीपी मशीन व ग्लुकोमीटरच्या सहाय्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेची मोफत तपासणी केली जाते.
• 30 वर्षांवरील महिलांमध्ये गर्भाशय मुख व स्तन कर्करोगाचे प्राथमिक परीक्षण केले जाते.
• तपासणी केलेल्या प्रत्येक नागरिकाची माहिती शासनाच्या अधिकृत NCD डिजिटल पोर्टलवर नोंदवली जाते.
*वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी व उपचार प्रक्रियेवर नियंत्रण*
या प्रक्रियेत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत -
• आशा स्वयंसेविका व एएनएम यांनी स्क्रीनिंग करून पाठवलेल्या संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून अंतिम निदान केले जाते.
• राष्ट्रीय उपचार पद्धतीनुसार आवश्यक औषधे व डोस निश्चित करून उपचार सुरू करण्यात येतो..
• तोंड, स्तन व गर्भाशय मुख कर्करोगाच्या संशयित रुग्णांची तपासणी केली जाते.
• पुढील तपासणी अथवा तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असल्यास रुग्णांना सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ येथे संदर्भित करण्यात येते.
• जुनाट आजार असलेल्या रुग्णांची दरमहा तपासणी करून त्यांच्या प्रकृतीचा व औषधांच्या परिणामांचा आढावा घेतला जातो.
*तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व 30 वर्षांवरील नागरिकांनी या असंसर्गजन्य रोग तपासणी कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच विविध प्रकारच्या कर्करोगाच्या निदानासाठी आपल्या जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी करतानाच प्राथमिक तपासणीत कर्करोगाचा संशय आढळल्यास पुढील तपासणी व उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे माहिती दिली आहे.*
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times