ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

*आरोग्यप्रेमी नागरिकांच्या एकत्रित उदंड सहभागातून आंतरराष्ट्रीय योग दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा*


 

            आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या सहकार्याने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात आयोजित योगविषयक विशेष कार्यक्रमात विविध वयोगटातील 5 हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत ‘स्वच्छतेतून आरोग्य व आरोग्यासाठी योग’ असा संदेश व्यापक स्वरूपात प्रसारित केला.

            याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक, नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, कार्यक्रमाचे निमंत्रक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री.गिरीश म्हात्रे व उपसभापती श्री.राजू मढवी, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, शिक्षण विभाग उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, क्रीडा विभाग उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, कार्यकारी अभियंता श्री.राजेश पवार, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या शिलादिदी, द आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री. रत्नेश्वर शेट्ये, योग प्रशिक्षक श्री.प्रमोद कोकणे व श्रीम.दिप्ती देशपांडे आदी मान्यवर तसेच इतर अधिकारी, नागरिक व विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.



            मानसिक शांती व शारीरिक क्षमतावृध्दी करणा-या योगाचे महत्व केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील विविध देशांमधल्या लोकांना समजले असल्याचे सांगत वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी केवळ आजच्या योग दिनापुरते नाही तर वर्षाचे 365 दिवस योगासनांच्या माध्यमातून प्रत्येकाने आपले आरोग्य जपावे असे आवाहन केले.  माणसाचे मन शुध्द व संतुलित करणा-या आणि संयमाचे महत्व अधोरेखित करणा-या योगाचे महत्व पंतप्रधान ना.श्री.नरेंद्र मोदी यांनी योग दिनाच्या माध्यमातून जगभरात वृध्दींगत केले असे ते म्हणाले. योगाव्दारे मनाची व शरीराची निगा राखण्याप्रमाणेच पर्यावरणाचा समतोल राखण्याचीही गरज त्यांनी विशद केली.



            नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी आदीनाथ शंकरांपासून योगविद्येची सुरूवात झाली असा उमगाचा उल्लेख करीत ऋषीमुनींपासून पुढे चालत आलेले हे योग ज्ञान आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याचे सांगितले. योग म्हणजे केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर ती तनामनाची शुध्दी करणारी नियमित आचरणात आणावी अशी  गोष्ट असल्याचे सांगत महापौर महोदयांनी योगाचे महत्व विशद केले.

आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी याप्रसंगी बोलताना पंतप्रधान महोदयांच्या प्रेरणेतून मागील 12 वर्षांपासून नवी मुंबईत सातत्याने योगविषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मन:शांती, प्रकृती स्वास्थ्य यांची योगाद्वारे जपणूक होतेच, शिवाय योगाच्या दैनंदिन आचरणामुळे आपण थकलेले वृध्द होत नाही तर मनाने नेहमी तरूण राहतो अशीही वस्तुस्थिती  त्यांनी व्यक्त केली. 



            विशेष म्हणजे वनमंत्री, महापौर, आमदार, आयुक्त व उपस्थित मान्यवरांनी नागरिकांसह योगक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला.

द ऑर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशिक्षक श्री.प्रमोद कोकणे व श्रीम.दिप्ती देशपांडे यांनी सहजसाध्या पध्दतीने योगक्रिया करून घेतल्या तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या शिलादिदी यांनी मन:शांतीची प्रात्यक्षिके करून घेतली.  यावेळी उपस्थित मान्यवरांचे वृक्षरोपांच्या कुंड्या व योगविषयक ग्रंथभेट देऊन पर्यावरणस्नेही  स्वागत करण्यात आले.

            यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन  ‘निरोगी वृध्दत्वासाठी योग’ (Yoga for Healthy Ageing) या संकल्पनेवर आधारित जगभरात साजरा करण्यात येत असून देशातील सुपर स्वच्छ शहर असा नावलौकिक असणा-या नवी मुंबईने स्वच्छता, आरोग्य आणि योग या त्रिसूत्रीचे महत्व अधोरेखित करीत विशेषत्वाने विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील आरोग्यप्रेमी नागरिकांना एकत्र आणत अत्यंत उत्साहाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट