पाली-खोपोली राज्य महामार्गाची दुरवस्था
हेदवली येथे मोठा खड्डा अपघातांना आमंत्रण
पाली (निशांत पवार) :- पाली-खोपोली राज्य महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वीच या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले होते, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही वर्षांतच रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सध्या या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, हेदवली येथे तर रस्त्याच्या कडेला मोठा आणि धोकादायक खड्डा पडला आहे, ज्यामुळे येथे कधीही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
रात्रीच्या वेळी किंवा पावसाच्या दिवसात हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास भीषण अपघात घडू शकतो. या महामार्गावर काही ठिकाणी चक्क काँक्रीटच्या रस्त्याला डांबरीकरण करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य वाढत चालले असून अपघातांची मालिका देखील सुरूच आहे. फक्त हेदवलीच नव्हे, तर उंबरे गावाच्या अलीकडे, मिरकुटवाडी, गोंदाव फाटा, परळी, जांभूळपाडा, वऱ्हाड, रासळ आणि वझरोली अशा अनेक ठिकाणी रस्त्यावरती मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या मधोमध काँक्रीट जाऊन त्या ठिकाणी रुंद भेगा पडल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून, अत्यंत सावधगिरीने वाहने चालवावी लागत आहेत. स्थानिक तसेच रोज प्रवास करणाऱ्या चालकांना या खड्ड्यांचा अंदाज असतो, मात्र या मार्गावर येणाऱ्या नवीन वाहनचालकाला अचानक समोर येणाऱ्या खड्ड्यामुळे गाडीवरचे नियंत्रण ठेवणे कठीण होते. अचानक ब्रेक दाबल्यामुळे किंवा गाडी अचानक खड्ड्यात गेल्यामुळे बाचकायला होऊन सातत्याने अपघाताची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन, केवळ वरवरची डागडुजी न करता हेदवलीसह इतर सर्व ठिकाणचे खड्डे दर्जेदार पद्धतीने बुजवावेत, जेणेकरून वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित होईल.
पाली खोपोली राज्य महामार्ग दुरवस्थे संदर्भात एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सारंग इनामदार यांच्यासोबत बोलणे झाले असता त्यांनी सांगितले की या राज्य महामार्गाची देखभाल दुरुस्ती लवकरच करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम लागलीच करण्यात येईल असे इनामदार म्हणाले.
पाली-खोपोली महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम होऊन काहीच वर्षे झाली आहेत, पण रस्ता एवढ्या लवकर खराब होणे हे कामाच्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे लक्षण आहे. प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची योग्य ती डागडुजी करावी. जर प्रशासनाने यावर लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही आणि यामुळे एखादा अपघात घडला, तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत.
--सुनील साठे, अध्यक्ष, मनसे, सुधागड तालुका
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times