रेल्वेतील वाढत्या गुन्हेगारीची चिंता
मिरारोड- वैतरणा दरम्यान चालू वर्षात २७५ गुन्हे
वसई: मागील काही वर्षांपासून पश्चिम रेल्वेच्या स्थानक परिसरात व लोकाल मध्ये प्रचंड पर्दी वाढू लागली आहे. याच गर्दीचा फायदा घेत आता रेल्वे उपनगरीय गाड्या व रेल्वे स्थानकात गुन्हाांचे प्रमाण वाढू लागले आहे. मिरारोड ते वैतरणा या सात रेल्वे स्थानकांच्या दरम्यान चालू वर्षात २७५ इतके गुन्हे घडले आहेत त्यातील ८२ गुन्हे उघडकीस आणण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. बसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरारोड, भाईंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, थिरार आणि वैतरणा अशा सात रेल्वे स्थानके येत आहेत, मागील काही वर्षांपासून या रेल्वे स्थानकातून प्रवास करणान्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. लोकल मध्ये व स्थानकात होत असलेल्या प्रचंड गर्दीचा फायदा आता भुरटे बोर घेत आहेत, त्यामुळे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात ही चोरीचे गुन्हे घडत आहेत. पाकीट मारी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, छेडाहात, बंग लिफ्टिंग, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे असे विविध प्रकारचे गुन्हे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात घडू लागले या घडलेल्या गुन्ह्यांपैकी आतापर्यंत केवळ ८२ गुन्हे उघड करण्यात आले आहे. गुन्हें कमी करण्यासाठी वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातही स्थानकात गस्त घालणे, अधूनमधून संशयितांची तपासणी, जनजागृती मोहीमा, फटका पॉईटवर लक्ष ठेवणे अशा उपाययोजना केल्या जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे. नागरिकांनी सुद्धा प्रवासाच्या दरम्यान सावधगिरी बाळगावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे. यात विशेष करून गर्दीच्या स्थानकात अशा प्रकारच्या घटना अधिक होत आहेत. विशेषतः विरार, नालासोपारा, नायगाव, वसई या स्थानकात सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असते. यंदाच्या चालू वर्षात जानेवारी ते २७ जून २०२६, या दस्थान सात रेल्वे स्थानकात २७७ इतके गुन्हे घडल्याची नोंद करण्यात आली आहे. विशेषता
प्रवासी वर्गात चिंता
मुंबई लोकल मधून प्रवास करताना केवळ चोरीचे प्रकार नाहीं तर वादविवाद यासारख्या घटना देखील समोर येत आहेत. नुकताच मुंबई लोकल मधून प्रवास करताना दरवाजा बंद करण्याच्या वादातून विरारच्या मयंक लौहार या तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर प्रवासी वर्गात ही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी बंग तपासणी मोहीम राबवून कारवाई करावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत. यात रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून मोबाईल लंपास करण्याच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत. मोठ्या संख्येने प्रवासी है मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येत असतात, तर सोनसाखळी चोरी, चिनयभंग, फसवणूक अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times