ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

*वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांमध्ये हिवताप / डेंग्यूबाबत जनजागृती*

 

 

        नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मा. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रा अंतर्गत पावसाळा कालावधीत प्रत्येक गुरुवारी विशेष हिवताप / डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात येत असून या शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शिबिरांना भेटी दिलेल्या नागरिकांमध्ये हिवताप /डेंग्यू व साथरोगा बाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे.

           दि. 04/06/2026 ते दिनांक 25/6/2026 या कालावधीत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 104 ठिकाणी जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांकरिता 36300 नागरिकांनी भेट दिली असून, 1718 रक्तनमुने घेण्यात आले. यामध्ये गुरुवार दिनांक 25/6/2026 रोजी आरोग्य परिरक्षण व वैद्यकिय सहाय्य समिती  सभापती डॉ. जयाजी नाथ व संपुर्ण आरोग्य समिती पथकाने सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली येथे आयोजीत शिबीराच्या ठिकाणी भेट दिली.



        

त्याचप्रमाणे सोमवार दि. 29/06/2026 रोजी वटपोर्णिमेचे औचित्य साधुन महिलांमध्ये विशेष जनजाग्रुती करणेकरीता नमुंमपा कार्यक्षेत्रात हिवताप / डेंगी आजाराबाबत जनजागृती करण्यात आली असुन एकुण 25 शिबीरांचे आयोजन करण्यात आले यामध्ये  एकुण 10442 महिलांनी / नागरीकांनी लाभ घेतला असून, एकुण 153 रक्त नमुने घेण्यात आले आहेत.

          सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून तसेच पाणी साठवून ठेवलेले ड्रम ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याबरोबरच घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थानांची माहिती करून देणे, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरड्या ठेवणे, भंगार साहित्य टायर्स इ. नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, घर व परिसर स्वच्छता ठेवणे, पाणी उकळुन पिणे, भाजीपाला स्वच्छ धुवुन वापरणे, उघडयावरचे अन्न खाणे टाळणे  याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली.



         

तसेच पावसाळा कालावधीत घरात, घराभोवताली, सोसायटी आवारात, टेरेसवर भंगार सहित्यामध्ये पाणी साचून ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्ती होते यास्तव पावसाळ्यामध्ये घरांतर्गत ड्रम, कुंड्यांच्या खालील प्लेटमधील पाणी, झाकण नसलेली पाणी साठविण्याची भांडी, फेंगशुई, गॅलेरी / गच्चीवरील भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उधड्यावरील टायर्स, छतावरील प्लॉस्टिक कागद/ताडपत्री अशा  डासउत्पत्ती स्थानांची तपासणी करण्यात येते आणि बांधकामांवर विशेष लक्ष देऊन गप्पीमासे मोहिम राबविण्यात येते, जेणेकरुन सदर ठिकाणी डासउत्पत्ती होणर नाही.

          तरी आरोग्य विभागाच्या कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट