शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू 10 जण गंभीर जखमी
मुंबई: मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की शहरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत. यातच मुंबईतील देबूर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी मोठी दुर्घटना समोर आली आहे. चेंबूर येथील ११ नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक भलामोठा वृक्ष कोसळला. त्यामध्ये एका विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आई म्हणून खूप वाईट वाटतंय : महापौर
"अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला खूप वाईट वाटत आहे. महापौर नाही तर एक आई या नात्याने सुद्धा मला वाईट वाटत आहे. एक बाळ तिथे अडकून पडलेले आहे. त्याला रेस्क्यू करण्याचे काम चालू आहे. मी सुद्धा त्या ठिकाणी निघतेय', अशी भावनिक प्रतिक्रिया रितू तावडे यांनी घटनेनंतर दिली, तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले
या भीषण अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक शाळकरी मुले उपस्थित होते. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून, या अत्यंत दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर तब्बल 10 शाळकरी मुले गंभीररीत्या जखमी झाली आहेत, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बस टिळकनगरमधील युनिव्हर्सल शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे. मृत विद्यार्थ्यांचे नाव विहान श्रीवास्तव असून त्याचे वय 10 वर्ष एवढे होते. घटना घडली त्या क्षणी परिसरात एकच खळबळ अडाली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जखमी मुलांना बाहेर काढण्यात यश आले असले, तरीही एक शाळकरी मुलगा बसमध्येच अडकला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्यामध्ये यश आलं नाही.
दोषींवर कारवाई करणार : मुख्यमंत्री
चेंबूर येथील दुर्घटनेप्रकरणी आयुक्त अश्विनी भिडे, महापौर रितू तावडे यांच्याकडून माहिती घेतली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच, सदर दुर्घटनेची चौकशी करून त्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.
काळजी घ्या : एकनाथ शिंदे
भविष्यात अशी दुर्घटना घडू नये, यासाठी पालिकेने, अधिकाऱ्याऱ्यांनी काळजी घ्यावी आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times