बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सीबीएसई मंडळाच्या पाच नवीन शाळांमध्ये १ जुलै २०२६ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबईः मुंबईतील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २०२०-२१ पासून टप्प्याटप्प्याने १९ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न शाळा सुरु केल्या आहेत. या उपक्रमाचा विस्तार करत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून आणखी पाच नवीन सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या शाळांमधील नर्सरी ते इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेला दिनांक १ जुलै २०२६ पासून सुरुवात होणार आहे. मालाड (पश्चिम), मालाड (पूर्व), सांताकृझ (पूर्व), कांदिवली (पूर्व) आणि ग्रँट रोड (पश्चिम) येथे या शाळा सुरू करण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी , गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड या आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते.
महानगरपालिकेच्या १,११८ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ३ लाख १० हजार ४२६ विद्यार्थी शिक्षण घेतात. यासाठी ८ हजार ६३० शिक्षक आहेत.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून नव्याने सुरुवात करण्यात येत असलेल्या पाच सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळांची आता यात भर पडली आहे. या शाळांसाठी दिनांक १ जुलै ते १२ जुलै २०२६ या कालावधीत केयाळ ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महानगरपालिकेने सर्व आर्थिक व सामाजिक स्तरांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार शिक्षण पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाच नवीन मुंबई पब्लिक स्कूल मालाड (पश्चिम), मालाड (पूर्व), सांताक्रूझ (पूर्व), कांदिवली (पूर्व) आणि ग्रँट रोड (पश्चिम) परिसरात आहेत नवीन शाळा
असा घ्या प्रवेश
पालकांनी दिनांक १ जुलै २०२६ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत आपल्या पाल्याचा अर्ज सादर करायचा आहे. यासाठी पालक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov. in/irj/portal/anonymous/qlSchool पा संकेतस्थळावर वेट ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण आल्यास पालक संबंधित शाळेच्या मदत केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन मदत मिळवू शकतात.
(सीबीएसई) सुरू केल्या आहेत, मुंबई पब्लिक स्कूल, लिबर्टी गार्डन, मालाड (पश्चिम), मुंबई पब्लिक स्कूल-गोविंद नगर, मालाड (पूर्व), पब्लिक स्कूल-वाकोला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई पब्लिक स्कूल ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व) आणि मुंबई पब्लिक स्कूल-जगत्रायशकरशेठ, ग्रँट रोड (पश्चिम) येथे या शाळा सुरू करण्यात येत आहेत.
या शाळांमध्ये नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिलीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. खासगी शाळांची शुल्करचना परवडत नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.
मुंबईतील विविध विभागांमध्ये सीबीएसई मंडळाच्या शाळांचा विस्तार करून महानगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यास महानगरपालिका कटिबद्ध असून, या संधीचा लाभ घेऊन पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निक्षित करावा, असे आवाहन महानगरपालिका शिक्षण विभागाने केले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times