डान्स बार रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार ' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत प्रतिपादन
मुंबई: राज्यात डान्स बारवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या विद्यमान कायद्यातील पळवाटा बंद करण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र पोलीस अधिनियमात दुरुस्ती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या दुरुस्तीनंतर डान्स बार चालविण्यासाठी महाराष्ट्र डान्स बार कायद्यांतर्गतच परवाना घेणे बंधनकारक राहील. पोलीस कायद्यांतर्गत केवळ सादरीकरण (परफॉर्मिग लायसन्स) घेऊन डान्स बार चालविण्याची प्रथा यामुळे बंद होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर तसेच संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. वारंवार नियमभंग करणाऱ्या किंवा गुन्हे घडणाऱ्या आस्थापनांचा परवाना रद्द करण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव
ठाणे जिल्ह्यात ऑर्केस्ट्रा बार उशिरापर्यंत सुरू राहत असल्याबाबत सदस्य नानाभाऊ पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात डान्स बारवर अनेक निर्बंध असतानाही काही आस्थापनांकडून पोलीस कायद्यांतर्गत परफॉर्मिंग लायसन्स घेऊन प्रत्यक्षात डान्स बार चालविले जात आहेत. हा गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस कायद्यात दुरुस्ती करण्यात येत असून, त्यानंतर डान्स बार चालविणाऱ्या सर्व आस्थापनांना डान्स बार कायद्यांतील सर्व अटी व निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक राहील.
विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रूम) यामध्ये अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालणे व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम, २०१६ अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाही ध्वनिमुद्रित संगीतावरील नृत्य परवान्यास मंजुरी देण्यात आलेली नसल्याचे सांगितले.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत सार्वजनिक मनोरंजन नियमावलीनुसार परवानाधारक ऑर्केस्ट्रा बार यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जानेवारी २०२६ ते १२ जून २०२६ या कालावधीत एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी नऊ प्रकरणांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून उर्वरित नऊ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times