ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मा. महापौर व मा. आयुक्त यांची मेट्रो उड्डाणपुलाखाली विकसित होत असलेल्या उद्यान व भाईंदर (पश्चिम) येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कामांची पाहणी

मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता व मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांनी शहरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यामध्ये मेट्रो उड्डाणपुलाखाली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, पाळीव प्राणी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी विकसित करण्यात येत असलेल्या उद्यानाच्या कामाची तसेच भाईंदर (पूर्व) येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाची सविस्तर पाहणी करण्यात आली. यावेळी मा. स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गहलोत, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, सन्माननीय नगरसेवक/नगरसेविका, संबंधित अधिकारी, कंत्राटदार व कर्मचारी उपस्थित होते. मेट्रो उड्डाणपुलाखालील उपलब्ध मोकळ्या जागेचा नागरिकांच्या हितासाठी प्रभावी वापर व्हावा या उद्देशाने महानगरपालिकेमार्फत आधुनिक उद्यान, हिरवळ विकास, पादचारी पायवाटा, ओपन जिम, बसण्याची व्यवस्था तसेच विविध मनोरंजनात्मक सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना विरंगुळा, व्यायाम, आरोग्यवर्धन तसेच सामाजिक संवादासाठी एक दर्जेदार सार्वजनिक जागा उपलब्ध होणार आहे. पाहणीदरम्यान मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता यांनी उद्यानातील पायवाटा, हिरवळ विकास, वृक्षारोपण, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, नागरिकांसाठी बसण्याची सुविधा तसेच ओपन जिममधील व्यायाम साहित्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि त्याच्या स्थापनेची पद्धत यांचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांना सुरक्षित, आकर्षक व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कामांमध्ये कोणतीही तडजोड न करता नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना दिल्या. याचबरोबर भाईंदर (पूर्व) येथे उभारण्यात येत असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी विकसित करण्यात येणारे बास्केटबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, पिकलबॉल कोर्ट तसेच जलतरण तलाव (स्विमिंग पूल) यांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. शहरातील क्रीडाप्रेमी नागरिक, युवक व विद्यार्थ्यांना आधुनिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या पाहणीदरम्यान मा. महापौर यांनी सर्व क्रीडा सुविधांची गुणवत्ता, सुरक्षितता, देखभाल व्यवस्था तसेच नागरिकांना सहज वापरता येतील अशा सुविधा निर्माण करण्याबाबत आवश्यक निर्देश दिले. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच युवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रकल्पातील सर्व कामे उच्च दर्जाची व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांनी देखील संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना सर्व कामांवर नियमित देखरेख ठेवण्याचे, गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे तसेच नागरिकांना लवकरात लवकर या सुविधांचा लाभ मिळेल यासाठी आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश दिले. मिरा-भाईंदर महानगरपालिका शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा, सार्वजनिक विरंगुळ्याची ठिकाणे तसेच आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामे गतिमान करण्यात येत आहेत.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट