अध्यक्षपदी संदीप चव्हाण विक्रमी ३६६ मतांनी विजयी
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत
परिवर्तन पॅनेलचा ऐतिहासिक पराक्रम
सलग दुसर्यांदा सर्व जागांवर विजय; अध्यक्षपदी संदीप चव्हाण विक्रमी ३६६ मतांनी विजयी
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या २०२६-२०२८ या द्वैवार्षिक कार्यकारिणीच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने सलग दुसर्यांदा सर्वच्या सर्व जागा जिंकत नवा इतिहास रचला. मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही संपूर्ण कार्यकारिणीवर परिवर्तन पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांनी ३६६ मते मिळवत पत्रकार संघाच्या इतिहासातील सर्वाधिक मतांचा विक्रम नोंदविला. त्यांचे प्रतिस्पर्धी विष्णू सोनवणे यांना केवळ १०८ मते मिळाली.
उपाध्यक्षपदी स्वाती घोसाळकर (३२४) आणि राजेंद्र हुंजे (२८९) विजयी झाले. या पदासाठी संतोष गायकवाड (१३१), रवींद्र भोजने (१०१) आणि नितीन सोनवणे (९८) यांचा पराभव झाला. कार्यवाहपदी शैलेंद्र शिर्के (२७०) यांनी विजय मिळविला. मंगेश वरवडेकर यांना १०८, तर दीपक परब यांना ९७ मते मिळाली. कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड (३३५) विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी कुलदीप घायवट यांना १३५ मते मिळाली. विश्वस्तपदी प्रकाश कुलकर्णी (३११) विजयी झाले. तर अरविंद सुर्वे यांना १५० मते मिळाली.
कार्यकारिणी सदस्यांच्या नऊ जागांसाठी परिवर्तन पॅनेलचे गजानन सावंत (३०९), विनोद साळवी (२९८), आत्माराम नाटेकर (२९१), दिवाकर शेजवळकर (२८९), रजनीश राणे (२८४), अंशुमन पोयरेकर (२७६), सारंग दर्शने (२७४), राजेश खाडे (२७३) आणि किरीट गोरे (२६८) हे विजयी झाले.
या निवडणुकीत उमा कदम (१६९), नंदकुमार पाटील (१६८), आशीष बनसोडे (१६८), महेंद्र जगताप (१६५), काशिनाथ म्हादे (१६४), श्रीकांत भोसले (१४७), केतन खेडेकर (१३४), नितीन सोनवणे (१०६) आणि अमृत सुतार (९७) यांचा पराभव झाला.
आम्ही लोणावळा विश्रामधाम नूतनीकरणासह केलेल्या विकासकामांवर मतदारांनी दाखविलेला हा विश्वास असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी व्यक्त केली. या निकालामुळे परिवर्तन पॅनेलने सलग दुसर्यांदा पत्रकार संघाच्या सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळवण्याचा मान पटकावला असून, संघाच्या इतिहासातील हा आणखी एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. अध्यक्षपदासह सर्व प्रमुख पदांवर परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत सदस्यांनी त्यांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times